Hot Posts

6/recent/ticker-posts

बळीराजाला मिळणारी विनाहमी दोन लाखाचे कर्ज,

बळीराजाला मिळणार विनाहमी दोन लाखांचे कर्ज,अत्यल्प भुधारक लहान शेतकऱ्यांना फायदा रिझर्व बँकेचा निर्णय


मुंबई: रिझर्व बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या नाणेनिधी धोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर ठेवल्याने स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या भागांचा हिरमोड केला आहे पण त्याचवेळी बळीराजाला मात्र आनंदाची भेट दिली आहे वाढत्या महागाईपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व बँकेने आता दोन लाख रुपये कर्ज हमी शिवाय देण्याची घोषणा केली आहे.

महागाई आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ लक्षात घेता कृषी कर्जाची मर्यादा 1.6 लाख रुपये वरून वाढवून दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पत धोरण आढाव्याची माहिती देताना रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले या निर्णयामुळे लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची बँकांकडून कर्ज घेण्याची  व्याप्ती वाढेल असेही ते म्हणाले रिझर्व बँकेने 2010 मध्ये कृषी क्षेत्राला कोणताही हमी न देता एक लाख रुपये देण्याची मर्यादा निश्चित केली होती नंतर 2019 मध्ये ती 1.6 लाख रुपये करण्यात आली नवीन निर्णयाबाबतचे परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे.

गृह कर्ज वाहन कर्जाचे हप्ते वाढणार नाही रिझर्व बँक ऑफ इंडिया वर्षाच्या शेवटी ग्राहकांना मोठा धक्का देताना व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर 6.5% वर कायम ठेवण्यात आल्यामुळे गृह कर्ज वाहन कर्ज तसेच अन्य प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यात कोणतीही वाढ होणार नाही. किंवा घट ही होणार नसल्याने दिलासा मिळालेला आहे परंतु स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे .रेपो दरात कोणताही बदल न करण्याची ही अकरावी वेळ आहे रिझर्व बँकेने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला आणि तो पाव टक्क्यांनी वाढवून 6.5% करण्यात आला होता तेव्हापासून त्यात बदल करण्यात आलेला नाही रेपो दर म्हणजेच बँकांना दिले जाणारा कर्जाचा दर बँका रिझर्व बॅंकेकडून अल्प मुदतीचे कर्ज किंवा कर्ज घेतात रिझर्व बँक अशा कर्जावर व्याज आकारते त्याला रेपो रेट म्हणतात., हा दर म्हणजेच बँकांना देण्याचा दर कमी होतो तेव्हा कर्ज स्वस्त होते. याचा थेट परिणाम आणि वैयक्तिक कर्जावर होतो या कर्जाच्या किमतीमुळे ईएमआय च्या किमती ही वाढतात सध्या तरी इ एम आय वाढण्याची चिंता रिझर्व बँकेने कमी केली आहे.

Post a Comment

0 Comments