सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी संकटात !शासकीय खरेदी केद्रांवरील जाचक अटीमुळे खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री
धाराशिव/राजगुरु साखरे : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन घेतात सर्वच शेतकरी सोयाबीनचा पेरा करतात त्यामुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता सर्वाधिक आहे मागील तीन वर्षापासून सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने सोयाबीनची थप्पी घरातच धुळखात पडून आहे. शेतकरी उसनेवारी व्याजाने काढून सोयाबीन लागवडीसाठी केलेला खर्च कसा फेडायचा असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे सोयाबीन घरातच असल्याने सावकार पैशासाठी बळीराजाच्या दारात चकरा मारत असल्याने शेतकरी महासंकटात सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीनला अपेक्षित दर मिळणे अवघड झाले आहे प्रतीक्षा करूनही भाव वाढत नसल्याने सोयाबीन घरातच ठेवावी की विकून मोकळी व्हावे या विवेंचनात शेतकरी सापडला आहे.नगदी आणि हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर लागवड केली जाते ज्यांना पैशाची नितांत गरज आहे ते शेतकरी हंगाम संपताच मिळेल त्या भावात सोयाबीन विकून मोकळी होतात तर काही शेतकरी भाव वाढ होईल या अपेक्षेने सोयाबीन राखून ठेवतात त्यानुसार यंदाही अनेक शेतकऱ्यांनी घरी व गोदामा मध्ये सोयाबीन साठवून ठेवली आहे मात्र रब्बी हंगाम निम्मा संपत आला तरी भावाढ होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सद्यस्थितीमध्ये बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4000 ते 4200 भाव मिळत आहे मात्र हा दर खर्चाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजा असल्याने सोयाबीन लागवडी वर केलेला खर्चही निघणेसा अवघड झाले आहे .बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली आहे मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे एकीकडे शासनाने हमीभाव केंद्र सुद्धा खरेदी केंद्र सुरू केले मात्र एक ना अनेक जाचक अटी लावल्यामुळे शेतकरी वैतागला असून आर्थिक अडचणीमुळे खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करत असल्याचे चित्र दिसून येत आहे . त्यामुळे शासनाच्या हमीभावाने सोयाबीन खरेदीची घोषणा केवळ बोलाचाच भात आंन बोलाचीच कडी अशी ठरत आहे.
0 Comments