श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीराचे उद्घाटन
![]() |
धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे. आंबेवाडी ता.जि. धाराशिव येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीरास प्रारंभ झाला. हे शिबीर दि. ५ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे.
या शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले गावचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते श्री. पांडुरंग तात्या सुतार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रथम शिबिरार्थी मुलींनी स्वागत गीताचे गायन केले. नंतर मान्यवर पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री. एस. व्ही. पाटील सर यांनी केले. या उद्घाटन प्रसंगी आपले विचार, मनोगत मांडत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबेवाडी येथील शिक्षक श्री. डी. व्ही. बोंदर सर यांनी आजच्या तरुणांनी मोबाईल पासून दूर रहावे, आपल्या आई-वडिलांचे कष्ट पहावे व त्या अनुषंगाने वर्तन ठेवावे असे सांगितले. शिबीराच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर यांनी शिबीरातील विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या विचारांचा दाखला देत श्रमदानाचे महत्त्व सांगितले. तसेच या शिबीर कालावधीत ग्राम स्वच्छता, रस्ते स्वच्छता, गाजर गवत निर्मुलन, वृक्षारोपन, शोषखड्डे, गटार दुरुस्ती, मंदिर सफाई, एड्स जनजागृती, बालविवाह प्रतिबंधक जनजागृती, अंधश्रद्धा निर्मुलन व विविध विषयावरील व्याख्याने इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी मौजे आंबेवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. नवनाथ क्षिरसागर, श्री. धनंजय कदम, श्री. आदतराव दरेकर, माजी सरपंच श्री. दादाराव सुतार तसेच जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, आंबेवाडी येथील मुख्याध्यापक श्री. एस. एस. निंबाळकर, श्री. डी.व्ही. बोंदर, श्री. आर. एल. बारखडे सर, सौ. एम. एस. दराडे मॅडम, सौ. एस. व्ही. वाघे मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्यक्रमाधिकारी सौ. जाधव एस. एल. मॅडम, सहकार्यक्रमाधिकारी श्री. मोहिते के. बी. सर, श्री. आर. एस. भोसले सर आदींची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. श्री. घोडके डी. वाय. सर तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. के. बी. मोहिते सर यांनी मानले.
या शिबिरासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, प्रशासकीय अधिकारी श्री. एस.एस. देशमुख सर आदींनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments