चिवरी येथील निकृष्ट रस्त्या कामाची अधिकार्यांकडून पाहणी; चांगल्या दर्जाचे काम करण्याची दिली तंबी
चिवरी/राजगुरु साखरे : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याचे निकृष्ट काम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता याचे वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकारी यांनी दि,२६ रोजी या कामास भेटी देऊन ठेकेदारास सूचना देण्यात आले आहेत. ग्रामस्थासह ग्रामपंचायत ने या कामाची चौकशी होऊन हे काम पुन्हा दर्जेदार करण्याची मागणी पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते,व अशा कामचुकार ठेकेदारस आमच्या गावचे रस्ता दुरुस्तीचे काम देऊ नका असे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला या महालक्ष्मीच्या रस्त्याला तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यमुळे या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने हा रस्ता अल्प कालावधीत टिकणारा आहे या रस्ता कामास निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे जागोजागी रस्त्यावर खड्डे पडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना ग्रामस्थासह भाविकांना जैसे थे कसरत करावी लागत आहे. याप्रकरणी उपविभागीय बांधकाम विभाग शाखा अभियंता व्ही.वाय. आव्हाळे यांनी संबंधित संबंधित ठेकेदारास फोन द्वारे संपर्क साधून यात्रेपूर्वी हा रस्ता करण्याचे सूचना दिल्या तसेच श्री आवळे यांनी यात्रीपूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे ग्रामस्थांना आश्वासन दिले. याञेपूर्वी हा रस्ता दुरुस्त नाही झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी उपसरपंच लक्ष्मण लबडे, संदीप शिंदे, रामकृष्ण मुळे ,शहाजी येवते, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे,, सामाजिक कार्यकर्ते बाळू देडे, गणेश झांबरे,स्वागत बिराजदार, अजित राजमाने, रवींद्र साखरे, आदींसह संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी राज्यसह परराज्यातील लाखो भाविक येतात मात्र या रस्त्याची दुरावस्थेमुळे भाविकांना प्रवास करताना नरक यातना सहन करावा लागत आहेत त्यामुळे हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो या प्रकरणी प्रशासनाने वेळेत लक्ष देऊन यात्री पूर्वी हा रस्ता चांगल्या दर्जाचा बनवण्यात यावा अन्यथा आम्ही ग्रामस्थासह आंदोलन व उपोषण करणार आहे असे ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, संदीप शिंदे यांनी इशारा दिला आहे.
संबंधित ठेकेदाराने अतिशय खराब रस्ता केलेला आहे, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ठेकेदाराची तक्रार केली आहे. तसेच यात्रेपूर्वी ठेकेदारास हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा या सूचना दिल्या आहेत.
व्ही.वाय. आवाळे. शाखा अभियंता उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी तुळजापूर
0 Comments