..... म्हणून मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानंतर पिकलेली पपई(papai) खावी
नमस्कार आजच्या लेखामध्ये आपण मांसाहार केल्या नंतर कोणते फळ खाल्ल्यानंतर उपयुक्त आहे हे जाणून घेणार आहोत
पपई हे फळ मुळचे दक्षिण मेक्सिको(Meksiko) मधील असून नंतर त्याचा प्रसार भारत श्रीलंका ऑस्ट्रेलिया आफ्रिका ब्राझील अशा अनेक देशांमध्ये झाला.पपईमध्ये प्रथिने खनिजे अ ,क ,जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते पपई जशी पिकते तसे तिच्यामधील vitamins क जीवनसत्व वाढतं.
पपई ही जेवणानंतर खाणं नेहमीच अधिक फायदेशीर ठरते., कारण पपई मुळे जेवण पचण्यास मदत होते त्यातून मांसाहार असेल तर जेवण झाल्यानंतर पपई आवर्जून खावी मांसाहार आहार पचायला जड असतो मांसाहार पचवण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणूनच मांसार पचवण्यासाठी पिकलेली पपई खावी त्याचप्रमाणे पचनशक्ती वाढवण्यासाठी ही पपई मदत करते. तसेच काही शारीरिक कारणास्तव भूक मंदावली असेल तर कच्च्या पपईची भाजी खाल्ल्यास पचनशक्ती वाढते पपई मधील पेपेन मुळे अपचन आम्लपित बद्धकोष्ठता हे पोटाची विकार दूर होतात त्यातून पिकलेल्या पपई मधून फळ शर्करा असते ती रक्तामध्ये लगेच शोषली गेल्याने ऊर्जा आणि उत्साही वाढतो.
फक्त पोटाच्या तक्रारीसाठीच नाही तर सौंदर्य वाढीसाठी ही पपई फार फायदेशीर आहे कच्चा पपईचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चकाकी येऊन पुटकुळ्या मुरमे सुरकुत्या नाहीशा होतात त्वचा कोरडी आणि सुरकुतली असेल उन्हामुळे त्वचेवर पुटकुळे आले असतील व त्यामुळे त्वचेचे आग होत असेल तर पपईचा रस त्वचेवर लावावा यामुळे दहा नाहीसा होऊन त्वचा नितळ होते.
0 Comments