मोबाईलची स्क्रीन गार्ड कमी दरात देण्याच्या वादातून मोबाईल दुकानदाराचा निर्घृण खून, सांगलीत भर दिवसा चौघा अल्पवयीनांचे कृत्य
सांगली: मोबाईलचे स्क्रीन गार्ड कमी दारात देण्याच्या वादातून चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनी युवकाचा कोयत्याने आणि चाकूने सभासद आठ ते नऊ वार करून निर्गुण खून केल्याची खळबजेन घटना सांगली बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे.प्रजासत्ताक दिनी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हल्लेखोर घटनास्थळावरून प्रसार झाले होते.
मात्र सांगली शहर पोलीस आणि तातडीने चार तासाच्या आत त्यांना ताब्यात घेतले विपुलपुरी गोपालपुरी गोस्वामी वय (19) राहणार चौथा माळा नयन अपारमेंट बापट बाल शाळेनजीक सांगली मूळ राहणार शिवाडा तालुका शितलवाना जिल्हा जालौर (राज्य राजस्थान ) अशी खूण झालेल्या युवकाचे नाव आहे .त्याचा भाऊ स्वरूपपुरी गोपालपुरी गोस्वामी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत या घटनेची पोलिसांकडून अधिक माहिती अशी की फिर्यादी स्वरूपकुमार आणि विपुलपुरी गोस्वामी हे दोघे बस स्थानकाची असणारे भैरवनाथ मोबाईल शॉपी हे दुकान चालवित होते रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास चौघेजण त्याच्या दुकानात आले त्यापैकी एकाच्या मोबाईलला स्क्रीन कार्ड बसवायचे होते., दुकानातील विपुलपुरी यांनी त्याकरता शंभर रुपये किंमत सांगितली असता संशयित आरोपींनी पन्नास रुपया मध्ये स्क्रीन कार्ड बसून देण्याची मागणी केली. यावरून त्यांच्यात वादावादी झाली त्यातून चौघांनी विपुलपुरी याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत आणि तिघांनी विपुलपुरी याला पकडले तर एका संशयिताने त्याच्याकडील कोयत्याने विपुल पोरीचे डोके, हात आणि कपाळावर सपासप वार केले.
यामध्ये विपुलपुरी खाली कोसळला दुसऱ्या संशयित यांनी पाईप मध्ये लपवलेला चाकूच्या साह्याने त्याला भोसकले भाऊ विपुलपुरी याला वाचवण्यासाठी असलेल्या स्वरूपपुरी याला देखील संशयित आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कोयतेने वार केले. आरडाओरडा झाल्याने परिसरात नागरिक गोळा झाल्याचे लक्षात येताच कोयत्याचा धाक दाखवीत हल्लेखोर तेथून पसार झाले दरम्यान प्रचंड रक्तस्त्राव झालेल्या विपुलपुरी गोस्वामी बेशुद्ध पडला होता उपस्थित आणि तातडीने दोघा जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णाला दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विपुलपुरी यांच्या मृत्यू झाल्याचे सांगितले. बस स्थानक परिसरात भर दिवसा खून झाल्याची कळतात परिसरात एकच खळबळ उडाली होती.
शहर पोलिसांना याची माहिती मिळताच काही वेळातच पोलीस निरीक्षक संजय मोरे ,पोलीस उप निरीक्षक महादेव पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून तसेच परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून हल्लेखोरांच्या शोधार्थ पथक रवाना केली अवघ्या चार तासानंतर पोलिसांनी बायपास रस्ता नवीन पुलाजवळ लपलेले हल्ले खोरांना ताब्यात घेतले हल्लेखोराकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले कोयता आणि चाकू हस्तगत करण्यात आला आहे.
खुनापूर्वी हल्लेखोर यांनी काढली रिल्स
अल्पवयीन हल्लेखोर हे 16 ते 18 या वयोगटातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.त्यातील एक शाळकरी गणवेश घालूनच मोबाईल दुकानात गेला होता.विपुलपुरी याच्यावर हल्ला करण्यापूर्वी संशयित हल्लेखोरांनी कृष्णा घाटावर मोबाईलवर रिल्स काढली होती त्याचं धुंदीतच ते स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी मोबाईल शॉपी मध्ये आले होते तेथे वाद झाल्याने त्यांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता विपुल पुरी याच्यावर कोयता आणि चाकूने हल्ला चढवला असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
पुन्हा अल्पवयीन गुन्हेगार
मागील काही महिन्यापासून गुन्हेगारीत वाढच होत आहे त्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत चालला आहे अल्पवयीन गुन्ह्यात सहभागी असल्याने त्यांना शिक्षा देखील फारशी होत नाही रविवारी देखील परिसरात झालेल्या खून प्रकरणात चौघे अल्पवयीन असल्याचे समोर आले एवढ्या लहान वयात त्यांच्याकडे चाकू आणि कोयता ही हत्यारे कशी आली याचा प्रश्न पोलिसांचा नागरिकांना पडला आहे आली?यापूर्वी संशयतीवर कोणते गुन्हे दाखल नाहीत याची माहिती पोलिसांनी दिली.
0 Comments