लाचखोरीचा कळस : शिक्षकाकडून 1 लाख 55000 ची लाच घेताना संस्था सचिव गजाआड ! तुळजापूर येथे एसीबीच्या पथकाची कारवाई शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
धाराशिव : शिक्षकाचा स्वेच्छा सेवानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यासाठी एक लाख 55 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या शिक्षण संस्थेच्या लाचखोर सचिवास रंगेहात पकडून गजाआड करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तुळजापूर येथे शुक्रवारी दिनांक 21 रोजी ही कारवाई केली एसीबीच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट कारभारचा चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत एसीबीने दिलेली अधिक माहिती अशी की तक्रारदार हे रावसाहेब जगताप कर्णबधिर विद्यालय तुळजापूर येथे कलाशिक्षक या पदावर नोकरीच होते त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्यासाठी विनंती अर्ज केला होता तक्रारदार यांचा स्वेच्छ सेवानिवृत्ती अर्ज मंजूर करण्यासाठी ठराव घेण्याकरिता रावसाहेब जगताप कर्णबधिर विद्यालय संस्थेचे सचिव धनाजीराव ज्ञानदेव पेठे पाटील वय 55 राहणार मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती त्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने शुक्रवारी तुळजापूर येथील संस्थेच्या कार्यालय परिसरात सापळा रचला होता., दरम्यान संस्था सचिव पेठे पाटील यांनी तक्रारदार यांना पंचा समक्ष लाचेची मागणी करून एक लाख 55 हजार रुपयाची लाच स्वीकारली यावेळी एसीबीच्या पथकाने त्यास लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली त्या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती एसीबी चे उपअधीक्षक सिद्धाराम मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम पोलीस अमंलदार सिद्धेश्वर तावस्कर जाकीर काजी नागेश शेरकर शशिकांत हजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments