चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेत भाविकांच्या प्रवासासाठी ज्यादा एसटी बसेस सोडण्याची भाविकांची मागणी
तुळजापुर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेस दिनांक 18 पासून प्रारंभ होत आहे. यात्रेमध्ये राज्यासह परराज्यातील लाखो भाविक सामील होतात मात्र येणाऱ्या भाविकांना महालक्ष्मीच्या दर्शनासाठी पोहोचण्यासाठी अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे., त्याचबरोबर भाविकांना ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत महालक्ष्मी यात्रेमध्ये जाण्या येण्यासाठी एसटी महामंडळ याने तुळजापूर - चिवरी ,सोलापूर ते चिवरी तसेच नळदुर्ग ते चिवरी मंदिर अशा यात्रेच्या दिवशी ज्यादा बसेसच्या फेरी चालू करण्यात यावे अशी मागणी भाविका मधून होत आहे सद्यस्थिती पाहत चिवरी गावाला मागील पाच वर्षापासून बस बंद असल्यामुळे येथील ग्रामस्थांची देखील गैरसोय होत आहे असे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे, एस टी महामंडळाला चिवरी गावला बसेस सोडण्याचे वावडे आहे का ? असा सवाल भाविकांसह सुजान नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याने तत्काळ लक्ष देऊन चिवरी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी तात्काळ ज्यादा बसेसचे उपायोजना करण्यात यावी अशी मागणी भाविकातून जोर धरत आहे.
0 Comments