Hot Posts

6/recent/ticker-posts

अज्ञान मुलांचा ताबा मिळण्याचा अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात अज्ञान मुलाचा ताबा कोणाला मिळतो ?

अज्ञान मुलांचा ताबा मिळण्याचा अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात अज्ञान मुलाचा ताबा कोणाला मिळतो ?

पती-पत्नीच्या कौटुंबिक वादामध्ये जेव्हा अज्ञान मुलाचा ताबा मिळावा व ती मुले पाच वर्षापेक्षा जास्त वयाची असतील तर त्या अर्जामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाचे हित कोणाकडे ताबा ठेवण्यात आहे हे पाहिले जाते त्यामध्ये पती व पत्नी यांची आर्थिक परिस्थिती पती व पत्नी यांची कॅरेक्टर पती व पत्नी यांच्यापैकी कोण मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ पालनपोषण शिक्षण करू शकते या सर्व गोष्टी पाहिल्या जातात जर पती किंवा पत्नी यांच्यापैकी कोणी विविचारी जीवन जगत असेल किंवा पहिले लग्न झालेले असताना व त्या लग्नाचा घटस्फोट झालेला नसताना पर पुरुषासोबत किंवा पर श्री सोबत पती किंवा पत्नी सारखे राहत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांचे जे नैसर्गिक पालन करत आहेत त्या नैसर्गिक पालनकर्त्याकडे मुलाचा ताबा ठेवला जाऊ शकतो मान्य न्यायालयांमध्ये मुलांच्या हिताबाबत कोणत्या प्रकारचा पुरावा येतो यावर मुलाचा ताबा कोणाकडे ठेवणे फायदेशीर आहे याचा विचार मान्य न्यायालयामध्ये केला जातो व त्याप्रमाणे मुलाचा ताबा संबंधित पालकाकडे ठेवला जातो.

Post a Comment

0 Comments