Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.ऋषिकेश कानडे यांनी एमबीबीएस परिक्षेत केले उज्वल यश संपादन

 डॉ.ऋषिकेश कानडे यांनी एमबीबीएस

 परिक्षेत केले उज्वल यश संपादन.

"""""""""""""""""'""""""""""""""""""""'""""""""


इटकळ ( दिनेश सलगरे ):- डॉ.ऋषिकेश कानडे यांनी जीएसएमसी केईएम कॉलेज (परेल दादर) मुंबई येथे शिक्षण घेऊन एमबीबीएस परीक्षा २०२५ मध्ये झालेल्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उतीर्ण होउन एमबीबीएस डॉक्टर ही पदवी प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

डॉ.ऋषिकेश परशुराम कानडे हे अणदूर येथील रहिवाशी असुन सध्या सोलापूर येथे स्थायिक झाले आहेत.

त्यांनी इयता पहिली ते चौथीचे शिक्षण हे जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा अणदूर येथे पूर्ण केले असुन,

पाचवी ते दहावीचे शिक्षण हे जवाहर विदयालय अणदूर येथे घेतले आहे. 

त्यांनी इयत्ता दहावीला जवाहर विद्यालयाच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने आपले नाव नोंदवून इयत्ता दहावी मध्ये १००% गुण घेऊन संस्थेची मान उंचाविली आहे.

त्यावेळेस जवाहर विदयालयाचे सचिव व महाष्ट्राचे साने गुरुजी मा.कै.सिद्रामाप्पाआलुरे गुरुजी यानी त्याचे कौतुक करत असताना म्हणाले, कि ऋषिकेशनी आज मी गोरगरिबासाठी चालु केलेल्या शिक्षण संस्थेचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरल्याने

 मी आज खुप समाधानी आहे. 

आणि भविष्यात ही अशीच प्रगती करणार असे उद्‌गार काढून समाधान व्यक्त केले होते.त्यानंतर

इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण हे शाहु कॉलेज लातूर येथील नामवंत कॉलेज मध्ये पूर्ण केले असुन शाहु कॉलेज हे डॉक्टर बनविण्याचा कारखाना म्हणून भारत देशात प्रसिद्ध असलेल्या या कॉलेज मधून अकरावी बारावीचे यशस्वी शिक्षण घेऊन त्यानी निट परिक्षेत सातशे विस पैकी सहाशे तीस गुण घेऊन यश संपादन केले.

त्यानंतर त्यानी महाराष्ट्रातील इंग्रजानी सुरु केलेल्या व आज वर्षी शंभर वर्ष केलेल्या अशा नामवंत मेडिकल कॉलेज असलेले सेठ जीएसएमसी केईएम मेडिकल कॉलेज (परेल दादर) मुंबई या ठिकाणी पहिल्या गुणवता यादीत प्रवेश मिळाला. 

एका अणदूर सारख्या खेडेगावात शिक्षण घेतलेल्या डॉ.ऋषिकेश यानी या मेडिकल कॉलेज मध्ये असलेली, कडक,शिस्त,नियम यांचे काटेकोर पणे पालन करून चार वर्षाचे खडतर मेडिकल कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले.

जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या शेवटच्या वर्षाच्या परिक्षेची परिक्षा देऊन त्यानी यश संपादन केले.

या यशामध्ये त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे काका कै.शिवराम कानडे,आजी कै.निलाबाई कानडे तसेच भाऊ रोहित कानडे कॉम्पूटर इंजिनिअर,बहीण डॉ. ऋतुजा कानडे,व त्याचे आई सौ.सविता कानडे वडिल श्री.परशुराम रखमाजी कानडे आणि विशेष म्हणजे त्याला पहिली ते आजपर्यत शिक्षण देणारे सर्व शिक्षक वृंद यामुळे त्यानी हे यशाचे शिखर पार करून एमबीबीएस डॉक्टरची पदवी मिळविल्या बदद्ल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

यामध्ये सेवानिवृत मुख्याध्यापक श्री. डिंगबर रोकडे सर यानी डॉ.ऋषिकेश कानडे यांचे स्वागत करून शुभाशिर्वाद दिला.

Post a Comment

0 Comments