उसाच्या ट्रक खाली दबून सहा मजुरांचा मृत्यू,कन्नड-पिशोर मार्गावरील भीषण अपघात नऊ जण जखमी, सात कुंड गावावर शोककळा
छत्रपती संभाजीनगर: ऊस घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने त्याखाली दबून सहा मजुरांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास किशोर कन्नड मार्गावर खांडी चंदन नाल्याजवळ वळण रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. यातील अमृत व जखमी मजूर हे सात कुंड तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात मयतावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
कन्नड तालुक्यातील रसवंत यांना लागणारा ऊस घेऊन ट्रक Jt टीव्ही 83 86 रविवारी मध्यरात्री गुजरात कडे जात होता जवळपास 15 ते 20 ऊसतोड मजूर ही याच ट्रक वरील उसाच्या मळ्यावर बसून प्रवास करत होते पिश फिशरहून कन्नड कडे येत असताना थंडी चंदन नाल्याजवळील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला दुर्घटना घडली त्या बाजूला मोठा नाला होता ट्रक मधील मोळ्या नाल्यात पडल्या वर बसलेले मजूर त्याखाली दबले गेले वेळ मध्यरात्रीची होती व या मार्गावर वाहतूक ही कमी होती त्यामुळे घटनास्थळी मदत लवकर पोहोचू शकली नाही तासाभराने तिथून जाणाऱ्यांना अपघाताची घटना लक्षात आली. त्यांनी याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले.
जखमी मजुरांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण मेडके उपनिरीक्षक डीपी पवार पोलीस कॉन्स्टेबल धोडघर पोलीस कॉन्स्टेबल विजय चौधरी प्रवीण बर्डे संजय आटोळे आदींनी लोकांच्या मदतीने जखमींना ऊस बाजूला करून बाहेर काढले.
मृतांची नावे : किसन धर्म राठोड वय 30 मनोज नामदेव चव्हाण वय 23 कृष्णा मूलचंद राठोड वय 30, मिथुन महारु चव्हाण वय 26 सर्व राहणार सात कुंड तालुका कन्नड या चार जणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले तर विनोद नामदेव चव्हाण वय 28 राहणार सात कुंड यांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात तसेच ज्ञानेश्वर देविदास चव्हाण वय 36 राहणार बेलखेडा तालुका कन्नड यांचा एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वृत्तावर सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
जखमींची नावे : इंदलचंद प्रेमचंद चव्हाण, सचिन भागिनाथ राठोड, रवींद्र नामदेव राठोड , सागर भागिनाथ राठोड ,राहुल नामदेव चव्हाण ,लखन छगन राठोड सर्व राहणार सातकुंड इस्माईल अब्दुल जेडा (चालक) राहणार जेडा गुजरात उमर मुसा जेडा राहणार जेडा गुजरात हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेमुळे सातकुंड गावावर शोककळा पसरली आहे.
0 Comments