Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात वाघोबाचा धुमाकूळ मलकापूर शिवारात वाघाचा दोन गाईवर हल्ला

धाराशिव जिल्ह्यात वाघोबाचा धुमाकूळ मलकापूर शिवारात वाघाचा दोन गाईवर हल्ला

धाराशिव: जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगात तळ ठोकलेल्या वाघाने कळंब तालुक्यातील मलकापूर शिवारात दोन गाईवर हल्ला केल्याचे समोर आले आहे हा प्रकार गुरुवारी दिनांक 13 रोजी सकाळी लक्षात आला असून मलकापूर येथील शेतकरी संतोष सर्जेराव लोमटे यांच्या शेतात घडला असून यामध्ये एका गाईचा जागीच मृत्यू तर दुसरी गाय गंभीर जखमी झाली आहे दरम्यान याबाबत माहिती मिळतात वन विभागाची टीम दाखल झाली असून घटनेच्या पंचनाम्यानंतर परिसरात शोध मोहीम ही सुरू करण्यात आली आहे.

मागील दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून धाराशिव जिल्ह्यातील येडशी अभयारण्याच्या परिसरात वाघासह बिबट्याचा वावर वाढला आहे आतापर्यंत 70 पेक्षा जास्त पाळीव जनावरावर या हिंस्र प्राण्यांनी हल्ले केले आहेत. मागील महिनाभरापासून यातील वाघास पकडण्यासाठी बाहेरची टीम या परिसरात तळ ठोकून असली तरी अद्याप त्यांना वाघास पकडण्यात यश आलेले नाही परंतु मागील पंधरा दिवसापासून वाघाकडून पाळीव प्राण्यांवर हल्ल्याची घटना घडली नव्हती त्यामुळे नेमका वाघ कोणत्या भागात आहे याचा थांग पत्ता लागत नसल्याने वनविभागाची टीम हैराण झाली होती. दरम्यान गुरुवारी सकाळी कळंब तालुक्यातील मलकापूर शहरात दोन गाईवर हिंस्र प्राण्यांनी हल्ल्या केल्याचे समोर आले आहे यामध्ये एका गाईचा फडशा पडला तर दुसरी गाय गंभीर  झाली आहे या गाई संतोष लोमटे यांच्या मालकीचे आहेत या घटनेची माहिती मिळताच वन विभागात चे टीम घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करण्यात आली तसेच जखमी गाईवर दहिफळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मोरे व सहाय्यक यांनी प्रथमोपचार केले यामध्ये पशुधन मालक संतोष लोमटे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधवातून होत आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यावर आली संक्रात

  • मलकापूर येथील शेतकरी संतोष सर्जेराव लोमटे हे अल्पभूधारक शेतकरी आहे शेतीवर गुजरान होत नसल्याने त्यांनी दोन गाई सांभाळल्या.
  • दुग्ध व्यवसाय करून उपजीव केला हातभार लावण्याचा उद्देशाने सांभाळलेल्या दोन्ही गाईवर बुधवारच्या रात्रीतून वाघाने हल्ला केला आहे त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
  • या घटनेत एक गाय मृत्युमुखी पडली आहे तर दुसरी गाय गाभण असून ती गंभीर जखमी झाली आहे या हल्ल्यामुळे लोमटे यांच्यावर संकट कोसळले असून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
  • मलकापूर येथील घटनेत एक गाय मयत झाली आहे तर दुसरी गाय जखमी आहे वाघाने तिच्या अन्ननलिकेचा चावा घेतला आहे ती गाभण असल्याने दहिफळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांनी काळजीपूर्वक उपचार केले.
शिकारी नंतर वाघ पुन्हा शिकारी जवळ येत असतो मात्र पांगरी येथे वाहनांचा आवाज वर्दळ असे डिस्टर्बन्स असल्याने तो परतला नाही मलकापूर येथील शिकारी जवळ परतण्यास पोषक वातावरण आहे;आम्हाला आशा आहे की तो परतेल.
                            बी.ए.पोळ विभागीय वन अधिकारी

Post a Comment

0 Comments