Hot Posts

6/recent/ticker-posts

नाशिक : वर्चस्ववादातून दोन सख्या भावांची हत्या ! पाच संशय पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : वर्चस्ववादातून दोन सख्या भावांची हत्या ! पाच संशय पोलिसांच्या ताब्यात


नाशिक: वर्चस्ववादातून दोन सख्ख्या भावांची टोळक्याने धारदार हत्यारांनी हत्या केल्याची घटना नाशिक शहरातील उपनगरच्या आंबेडकर वाडी भागात बुधवारी दिनांक १९ रोजी रात्री घडली या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी पाच संशितांना ताब्यात घेतली आहे सागर गरड अनिल रेडकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशिर सर्व राहणार (आंबेडकरवाडी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ची नावे आहेत.

रंगपंचमीच्या दिवशी बुधवारी दिनांक 19 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील बोधले नगर आंबेडकर वाडी येथे राहणारे उमेश भगवान जाधव व 30 व प्रशांत भगवान जाधव वय 32 हे दोघे भाऊ घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला उभे असताना मोटरसायकल वरून आलेल्या टोळकेयांनी त्यांना  त्यांनी कोयते कुराडी लोखंडी रोड आदींच्या साह्याने जाधव बंधू वर बिच्छूट हल्ला चढवला या हल्ल्यात एकाचा जागीच तर दुसरा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. जाधव बंधूंवर वर हल्ला केल्यानंतर टोळके घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेची माहिती मिळतात उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली व घटनास्थळी पंचनामा करून तपासाची चक्री फिरवली हल्लेखोरांचा माग काढत रात्रीतूनच पाच संशोयतीना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी ही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करीत घटनेचा आढावा घेतला.

परिसरात हळहळ

संशयित हल्लेखोरांच्या टोळकेने जाधव बंधू वर प्राण घातक हत्यार आणि हल्ला केला शरीराच्या प्रत्येक भागावर वार केल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे जाधव बंधूंच्या पश्चात आई व बहीण असा परिवार असून कुटुंबातील दोन तरुण मुलांची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात हळूहळू होत आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त 

उपनगर परिसरातील आंबेडकर वाडीत हत्तीची घटना घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे या हल्ल्यानंतर पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला त्यामुळे या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Post a Comment

0 Comments