प्रेमी युगलांना लग्न करण्यासाठी आळंदी ठरते राजश्रय!, प्रेम विवाह केलेल्या जोडप्यातील 70% होत आहेत घटस्फोट
धाराशिव: आई वडील आपल्या मुला-मुलींना जन्मापासून तळ हाताच्या खोडाप्रमाणे जगतात त्यांना लहानाचे मोठे करतात शिक्षणासाठी मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी ठेवल्यानंतर किंवा अगदी थोडेफार शिक्षण घेतलेली जोडपी अलीकडच्या काळात पळून जाण्याचे धक्कादायक प्रकार समजतात मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत.
मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडल्यानंतर काही दिवसात आपल्या पुढील आयुष्याचा कसलाही विचार न करता प्रेम विवाह करतात प्रेमविवाह करीत असताना मुलगा किंवा मुलगी यांच्याकडे रीतसर कागदपत्रे पुरावे म्हणजेच वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील अशा पळून जाणाऱ्या जोडप्यांसाठी देवाची आळंदी हे एक प्रकारचे राजा असल्याचे ठिकाण झाले आहे. कारण या ठिकाणी कोणतीही वयाची ठोस पुरावे नसली तरी या ठिकाणी पळून जाणाऱ्या मुला मुलींचे लग्न लावून देण्याचा धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आर्थिक देवाण-घेवाण करून चक्क देवाच्या दारात लग्न लावून देण्याचा धंदा गेल्या काही वर्षापासून आळंदी देवाची या ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेली चर्चा आहे या ठिकाणी लग्न केल्यानंतर लग्न झाल्याचे प्रमाणपत्र ही दिले जात असल्याचे समोर येत आहे यामुळे अशा पळून जाणाऱ्या जोडप्याला कायदेशीर कसल्याच अडचणी येत नाहीत या ठिकाणी केवळ पळून जाणारे प्रेमी युगल दोघेच जाऊन लग्न करतात आई-वडील किंवा कुठल्याही नातेवाईकांना स्थान पत्ता देखील लागत नाही; प्रेमीयुगांसाठी आळंदी ही राजश्रय बनले आहे मात्र या ठिकाणी झालेले 70 ते 80 टक्के विवाह फसत असून नंतर घटस्फोट होत असल्याचे समोर येत आहे.
जोडप्यांना समुपदेशन होणे आवश्यक
प्रेम विवाह फसतात याला कारण म्हणजे व्यसनाधीनता दोन्ही कुटुंबातील सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि परंपरा यामधील तफावत व्यवसाय नोकरी मुलं झाल्यावर कौटुंबिक जबाबदारी न पेलणे अशा अनेक वेगवेगळ्या कारणामुळे प्रेम असतात यामुळेच घटस्फोट होत आहेत यासाठी व्यवहार ज्ञान आवश्यक असते याबाबतची जाणीव सदरच्या जोडप्यांना समुपदेशाने करून देणे अतिशय आवश्यक ठरते.
0 Comments