केज : पाहुणा म्हणून आला आणि मावस बहिणीला पळवले केज तालुक्यातील घटना
बीड: मावशी व काका हे नातलगच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून मावस भावाने तेरा वर्षाच्या अल्पवयीन मावस बहिणीला फूस लावून पळून नेल्याची घटना केज तालुक्यातील एका वस्तीवर घडली आहे. बहिण- भावाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे
केज तालुक्यातील कोरेगाव परिसरात एका वस्तीवर आई-वडिलांसोबत राहत असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे 20 मार्च रोजी सायंकाळी नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी परगावी गेली होती; ही संधी साधून या अल्पवयीन मुलीचा धाराशिव जिल्ह्यातील मावस भाऊ हा त्यांच्या घरी आला त्याने मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चहा प्यायला जाऊ म्हणून तेरा वर्षे अल्पवयीन मावस बहिणीला त्यांनी चार चाकी वाहनात बसून फुस लावून पळून घेऊन गेला तो परत घरी आलाच नाही.दोघांचाही शोध नातेवाईकांकडे घेतला मात्र ते कोठेही मिळून आले नाहीत म्हणून शुक्रवारी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मावस बहिणीला अज्ञात करण्यासाठी पळून नेले म्हणून मुलीच्या मावस भावाविरुद्ध केस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड हे तपास करीत आहेत.
0 Comments