धाराशिव : चोरट्यांना विरोध केल्याने वृद्ध शेतकऱ्याचा खून चार जणावर गुन्हा दाखल धाराशिव तालुक्यातील थरारक घटना

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : चोरट्यांना विरोध केल्याने वृद्ध शेतकऱ्याचा खून चार जणावर गुन्हा दाखल धाराशिव तालुक्यातील थरारक घटना



धाराशिव : बोकड व शेळ्या चोरून नेताना चोरट्यांना विरोध केल्याने वृद्धाचा दगडाने मारहाण करून खून केला ही घटना धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी शिवारात रविवारी दिनांक 2 रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगळजवाडी येथील शेतकरी तानाजी भगवान मुळे वय (65) हे गावाजवळ असलेल्या त्यांचा शेतात पत्र्याच्या शेडमध्ये झोपली होती रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शेतकरी मुळे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसले यावेळी चोरटे दोन शेळ्या दोन बोकड चोरून नेत होते; दरम्यान झोपलेल्या मुळे यांना जाग आली त्यांनी आरडाओरोड करीत चोरट्यांना चोरी करण्यास विरोध केला यावेळी चोरट्याने मुळे यांना दगडाने जोरदार मारहाण केली त्यामध्ये मुळे यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ढोकी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे पोलीस उपनिरीक्षक जगताप माळी ते दूर क्षेत्राचे बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर यांच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन याप्रकरणी चौकशी केली या प्रकरणी विजय तानाजी मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय राजेंद्र पवार दोघे राहणार तेर, अमोल ईश्वर काळे, ईश्वर रामा काळे दोघे राहणार हिंगळजवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments