हवामान अंदाज :धाराशिव जिल्ह्यात चार दिवसात अवकाळीची शक्यता
धाराशिव: वातावरणात बदल झाला असून हवामान अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये आगामी चार दिवस आकाश स्वच्छ राहून तापमानाचा पारा 37 ते 40 अंशावर स्थिरावण्याची शक्यता आहे. 30 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील काही भागात तुरळक ठिकाणी मेघ गरजे गरजेनुसार अवकाळी पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील वातावरण दोन दिवसापासून बदललेले असून आगामी चार दिवसात जिल्ह्यातील काही भागात मेघ गरजेनुसार अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसात रब्बी हंगामातील पिकाची नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्याने रब्बी हंगामातील काढलेल्या पिकांची बुचाड लावून ठेवावे तसेच मळणी केलेल्या राशी निवाऱ्याला ठेवण्याची गरज आहे फेब्रुवारीपासून उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत मार्च महिन्यात उन्हाचा पारा 39 अंशावर पोहोचला आहेत चार दिवसापासून वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे उकडा वाढला आहे हवामान विभागाने मार्च अखेर अवकाळी पावसाची हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली आहे
0 Comments