माळशिरस : तोंडले गावच्या भूमिपुत्र दिनकर क्षीरसागर यांची पीएसआय पदी निवड – सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
अकलूज / संजय निंबाळकर : माळशिरस तालुक्यातील तोंडले गावच्या भूमिपुत्र दिनकर अंकुश क्षीरसागर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गाव आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
दिनकर यांचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहेत. अत्यंत साध्या आर्थिक परिस्थितीतून त्यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासाने तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
त्यांच्या यशाबद्दल गावातील नागरिक, मित्रपरिवार, कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. तोंडले गावाचा हा अभिमानास्पद क्षण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments