व्यवहाराचे पैसे दिले नाही, म्हणून...; स्वारगेट अत्याचार प्रकरणी रूपाली ठोंबरेंचा मोठा दावा-
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस डेपोत एका २६ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री अटक केली. कोर्टानं गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. कोर्टामध्ये दोन्ही बाजूनं युक्तीवाद सुरू आहे. अशातच राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहे.
या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी दावा केला आहे. ठोंबरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत हा दावा केला आहे.
फेसबुक पोस्टमध्ये रूपाली ठोंबरे नेमकं काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत पुणे स्वारगेट डेपोत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दावा केला आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, 'पुणे शिवाजीकोर्टात आरोपीला आणण्याच्यावेळी डीसीपी गिल साहेबांनी माझीच चौकशी केली होती. गिल साहेबांनी सांगितले की, ठोंबरे मॅडम तुम्ही आंदोलन करणार असाल, आरोपीला काळे फासणार असाल तर, असं प्लीज काही करू नका.
यावरून मी त्यांना सांगितले की, घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती घेऊन, ही माहिती खरी आहे की खोटी, हे खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही. तसेच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेल तर मी तुमच्यासोबत थांबते.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, 'पुणे शिवाजीकोर्टात आरोपीला आणण्याच्यावेळी डीसीपी गिल साहेबांनी माझीच चौकशी केली होती. गिल साहेबांनी सांगितले की, ठोंबरे मॅडम तुम्ही आंदोलन करणार असाल, आरोपीला काळे फासणार असाल तर, असं प्लीज काही करू नका.
मला कोर्टातील रिमांड रिपोर्ट पाहायचा आहे. केसची माहिती घेणं केस स्टडी करणं गरजेचं आहे. पण बस डेपोत झालेल्या घटनेत, पुणे नाहकच बदनाम झालंय.
एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो. दुसरे बस स्टँड आगर व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा, नाहीतर घरी बसा कायमचे', असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय.
0 Comments