Hot Posts

6/recent/ticker-posts

Tuljapur -itkal-मौजे केशेगाव येथील उद्योजिका सौ.अंबिका गावडे यांची आदर्श नारी पुरस्कारासाठी निवड

मौजे केशेगाव येथील उद्योजिका सौ.अंबिका गावडे यांची आदर्श नारी पुरस्कारासाठी निवड 

---------------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे केशेगाव येथील उद्योजिका सौ.अंबिका गावडे यांची आदर्श नारी पुरस्कारासाठी निवड.तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा २०२५ चा जिल्हा स्तरीय आदर्श नारी जीवन गौरव पुरस्कार केशेगाव ता तुळजापूर येथील उद्योजीका अंबिका मल्लीनाथ गावडे यांना जाहीर झाला आहे 

अंबिका गावडे या गेल्या दहा वर्षांपासून विविध उद्योग व्यवसाय सुरू करुन, महिलांना आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, गावात विविध शासकीय योजना लोकांना मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत,महिला संघटन करून महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करुन देण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे याची दखल घेऊन तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना २०२५ चा जिल्हा स्तरीय आदर्श नारी पुरस्कार जाहीर केला आहे.हा पुरस्कार सोहळा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपलं घर बालगृह येथे संपन्न होणार आहे 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजवादी नेते भाई पन्नालाल सुराणा हे आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला बालविकास अधिकारी किशोरजी गोरे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड सुजाता माळी, ॲड दिपाली जहागिरदार,बाल न्याय मंडळाचे सदस्य प्रा डॉ अश्रुबा कदम यांची उपस्थिती राहणार आहे,याच दरम्यान अणदूर येथील स्वरलता कराओके क्लबच्या वतीने अनाथ मुलांच्या मनोरंजनासाठी संगीत मैफिल संपन्न होणार असल्याचे संत तुकाराम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दयानंद काळुंके यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments