धनंजय मुंडे यांना दणका ,पोटगी देण्याच्या आदेशाविरोधातील अपील फेटाळले-
मुंबई: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरीम आदेशा विरोधात केलेली अपील शनिवारी माजगाव न्यायालयाने फेटाऊन लावले अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनीही याचिका फेटाळून लावली वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने 4 फेब्रुवारी रोजी करुणा मुंडे यांची याचिका अंशतः मान्य करून मुंडे यांना दरमा एक लाख 25 हजार रुपये यांनी त्यांच्या मुलींना दरमहा 75 हजार रुपये अंतरिम भरपाई म्हणून देण्याची निर्देश दिली होती त्या निर्णयाला मुंडे यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिले होते.
काय होता मुंडेंचा दावा
दंड अधिकाऱ्यांनी अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश चुकीचा असल्याचा दावा मुंडे यांनी अपिलात केला होता प्रतिवादी महलेशी त्यांची ओळख एका राजकीय पक्षाच्या बैठकीदरम्यान झाली आणि त्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीगाठी मुळे वैयक्तिक संबंध निर्माण झाली जे त्यांनी परस्पर संवाद आणि पुढे नेण्याचा निर्णय घेतला दोन मुले झाले आणि मुलांच्या अधिकृत कागदपत्रासाठी आपण आपले नाव आणि आडनाव वापरण्याची परवानगी दिल्याची मुंडे यांनी म्हटली होती तिने स्वच्छतेने त्यांच्याशी संबंध जोडण्याचा निर्णय घेतला तथापि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय राजे मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर आणि त्यांची पत्नी राजश्री मुंडे यांच्यासोबत मुंबईत अधिकृत निवासस्थानी राहू लागल्यानंतर प्रतिवादी महिलेच्या वर्तनात बदल झाल्याचा दावाही मुंडे यांनी केला होता महिलेने करुणा मुंडे नावाने सोशल मीडिया अकाउंट तयार करून आपली पत्नी असल्याची भासली आणि तथापि अपील करते आणि कधीही प्रतिवादी महिलाशी लग्न केले नसून ते राजश्री मुंडे यांच्याशी कायदेशीर या विवाहित असल्याची ही अपीलात म्हटली होती.
वांद्रे दंडाधिकारी यांचा निर्णय काय
तथापि तक्रार करती आणि तिच्या दोन मुलांना धनंजय मुंडे कडून 2018 पासून दुर्लक्षित केल्याची निरीक्षण वांद्रे दंडाधिकारी यांनी आदेशात नोंदवले होते तक्रार करतीने मुंडे यांच्या विरोधात केलेल्या आरोपाची आणि दाव्याचे समर्थन करणारे प्रथम दर्शनी पुरावे आहेत शिवाय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रास अन्य कागदपत्राचा विचार करता तक्रार करती ही त्याची पत्नी म्हणून ओळखली जाते हे स्पष्ट होते असे दंड अधिकारी आणि आदेशात नमूद केली होते मुंडे यांनी तक्रार करतींचा वैवाहिक दर्जा नाकारल्यामुळे तक्रार करती वर भावनिक अत्याचार होत असून तो घरगुती हिंसाचार असल्याचे न्यायालय तक्रार कृतीला अंतिम दिलासा देताना नमूद केली होते तसेच तक्रार करतील अर्जाच्या खर्चापोटी 25 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही मुंडे यांना देताना भावनिक त्रास आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन तक्रार करती आणि तिच्या मुलीला देखभाल खर्च देण्याचा अंतरिम आदेश देऊन अंतिम निकाल लागेपर्यंत तक्रारकर तिला पोटगी म्हणून दरमा एक लाख 25 हजार आणि त्यांच्या मुलीला दरम्या 75 हजार रुपये देखभाल खर्च देण्याची ही न्यायालयाने आदेश दिले होते.
0 Comments