मधुकर शेळके यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी निवड
धाराशिव(प्रतिनिधी):- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी संजीवा रेड्डी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.कैलासभाऊ कदम, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पुणे येथे दि.1 एप्रिल 2025 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) धाराशिव जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मधुकर शेळके हे गेल्या अनेक वर्षापासून चळवळीत व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. संघटीत व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना महाराष्ट्र इंटकच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस( इंटक)बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले,धाराशिव चे सुहास कानाडे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. निवडी बद्दल मधुकर शेळके यांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचे मी गांभीर्यपूर्वक व प्रामाणिकपणे काम करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. मधुकर शेळके यांच्या निवडीबद्दल त्यांचे मित्र परिवार, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
आपला स्नेहांकीत
मधुकर शेळके
जिल्हाध्यक्ष
राष्ट्रीय मजूर काँग्रेस (इंटक) धाराशिव
मो. 9822110654
0 Comments