भिंतीवर डोके आपटून सासूची हत्या सहा महिन्यापूर्वीच लग्न होऊन सासरी आलेल्या सुनेचे कृत्य, मृतदेह गोणीत भरून सुन फरार विल्हेवाटीचा प्रयत्न फसला जालना शहरातील भयभीत घटना
जालना: भिंतीवर डोके आपटून नवविवाहित सुनेने सासूची निग्रहण हत्या केली ही धक्कादाय घटना भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होता परंतु वजन जास्त झाल्याने आरोपी सुनेला मृतदेह उचलता आला नाही .त्यामुळे तिने मृतदेह असलेली गोणी तेथेच टाकून साथीदारासोबत दुचाकीवरून पलायन केले. या घटनेनंतर जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे सविता संजय शिनगारे वय 45 मूळ राहणार वावरे अंतरवाली तालुका गेवराई जिल्हा बीड असे मयत सासूचे नाव असून प्रतीक्षा अक्षय शिनगारे वय 23 असे संशयित सुनेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सहा महिन्यापूर्वी लग्न होऊन प्रतीक्षा शिनगारे कुटुंबाची सून झाली होती दरम्यान सदर बाजार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन ते तीन तासात सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य चौकशीच्या माध्यमातून आरोपी महिलेचा माघ काढून तिला परभणी येथे पकडून जेरबंद केले आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली. मयत सविता शिनगारे यांचे पति संजय शिंगारे यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने ती आणि मुलगा अक्षय सोबत राहत होते अक्षय लातूर येथे खाजगी कंपनी नोकरीला आहे त्यामुळे तो लातूर येथेच भाड्याची खोली घेऊन राहतो अक्षय याचे सहा महिन्यापूर्वी परभणी येथील प्रतीक्षा नावाच्या मुलीसोबत थाटामाटात लग्न झाले होते. त्यामुळे अक्षयची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या दोघी ज्यांना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात भाड्याच्या खोलीत राहत होत्या मध्यरात्री किंवा बुधवारी पहाटेच्या सुमारास सविता यांचा खून झाला खुनानंतर संशयित आरोपी सुनेचा मृतदेह सिमेंटच्या गोणीत भरून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु वजन जास्त असल्याने तिला गोणी उचलता आली नाही ही गोणी जिन्यात अडकल्याने घरमालकाने पाहून तिला सहज हटकले असता तिने मृतदेह असलेली गोणी पायऱ्याजवळ तशीच ठेवली साथीदाराला फोन करून बोलावून घेतले . पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य निपाणे हे देखील घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर महिलेचा भिंतीवर डोके आपटून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात घेण्यात आला. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात संशयित सुने विरोधी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आहे दरम्यान घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून या संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक भारती यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज हस्तगत
भोकरदन नाका भागात मुख्य रस्त्यावरच मालसुरे यांचे घर असून हा रस्ता वर्दळीचा आहे त्यामुळे खुनांच्या घटनेनंतर पोलिसांनी दोघी राहत असलेल्या इमारतीचे तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेची ताब्यात घेतले आहे या फुटेज वरून खून केल्यानंतर पहाटे पाच वाजून 28 मिनिटांनी संशयित प्रतीक्षा ही बाहेर पडतात दिसली सीसीटीव्ही फुटेज मुळे तपासाला मोठी मदत मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले
0 Comments