Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: यंदा सामान्य पेक्षा अधिक पाऊस, मराठवाड्यासह महाराष्ट्रात बरसणार

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: यंदा सामान्य पेक्षा अधिक पाऊस, मराठवाड्यासह महाराष्ट्रात बरसणार


नवी दिल्ली : यंदा सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे अंगाची अक्षरशा लाही लाही होत आहे मात्र पशु प्राण्यासह धरणी मातेचा हा दाह शांत करण्यासाठी वरून राजा देखील जोमाने बरसणार आहे हवामान खात्याचे अंदाजानुसार यंदा सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडेल विशेष म्हणजे दरवर्षी दुष्काळाच्या झळा शोषणाऱ्या मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात देखील सामान्य पेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नैऋत्य मान्सूनच्या पावसावर शेती अवलंबून असलेले आपल्या कृषीप्रधान देशासाठी ही दिलासादायक बातमी आहे.

भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत यंदाच्या पावसाळ्याचा अंदाज मांडला जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडू शकतो दीर्घकालीन सरासरीच्या एलपीए 105% पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत देशात 870 मिलिमीटर पाऊस पडला तर तो सामान्य मानला जातो भारतीय उपखंडात मान्सून पाऊस कमी पडण्यासाठी कारणीभूत असणारी हवामानाची ला निनोस्थिती यावेळी नसेल असे महापात्रा यांनी सांगितले सामान्य पेक्षा अधिक मान्सूनची स्थिती सर्वत्र नसेल तामिळनाडूचा मोठा भाग आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल तर महाराष्ट्र मध्यप्रदेश राजस्थान ओरिसा छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सामान्य पेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

देशभरात सामान्य पावसाची शक्यता 30 टक्के सामान्य पेक्षा अधिक पावसाच्या शक्यता 33% तर अतिवृष्टीची शक्यता 26 टक्के आहे यापूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने यंदा सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला होता हवामानातील एल निना आणि या घटकावर भारतातील मान्सूनची वाटचाल अवलंबून असते ला नीनो मुळे चांगला पाऊस पडतो तर एल निनो मुळे पावसाचे प्रमाण कमी होते.

अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली असली तरी काही ठिकाणी अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली आहे एप्रिल ते जून या कालावधीत उकाडा अजूनही वाढण्याचा अंदाज आहे वाढत्या तापमानासोबत पाण्याची टंचाई जाणवत शकते त्यामुळे सामान्य पावसाचा अंदाज सर्वांसाठी दिलासादायक आहे देशाच्या कृषी क्षेत्रावर 42.30% लोकसंख्या अवलंबून आहे आणि 52% शेती मान्सूनवर अवलंबून आहे त्यामुळे सामान्य पेक्षा अधिक पावसाचा अंदाज बळीराजासाठी आनंद वार्ता आहे.

Post a Comment

0 Comments