महिला वकिलास गावकऱ्यांची बेदम मारहाण, ध्वनी प्रदूषणाची तक्रार केल्याचा राग, सरपंचासह नऊ जनावर गुन्हा दाखल बीड जिल्ह्यातील घटना
अंबाजोगाई: धार्मिक कार्यक्रमाचा लाऊड स्पीकर जोराने वाजत असल्यामुळे त्रास होत आहे अशी तक्रार करणाऱ्या वकील महिलेला गावातील दहा पुरुषांनी शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली ही घटना १४ एप्रिल रोजी तालुक्यातील सनगाव येथे घडली या मारहाणीत महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान असे जखमी महिलेचे नाव आहे त्या येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकील करतात. याप्रकरणी १० जणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्गुण हत्तेच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारीच्या घटना चव्हाट्यावर येत आहेत जिल्ह्यात चोरी अपहरण विनयभंग या घटना बरोबरच हत्येचा घटना घडू लागली आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांनी गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा व मोठ्याने लाऊड स्पीकर लावणे तसेच त्यांच्या घरापुढील पीठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयाने तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेले गावचे सरपंच आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी या महिला वकील शेतामध्ये घेराव घालून अडवून त्यांना लाठ्या-काठ्या आणि पाईपच्या मदतीने बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिला वकिलास उपचारासाठी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात सरपंच व इतर नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे करीत आहेत.
0 Comments