Hot Posts

6/recent/ticker-posts

वधूला लग्नस्थळी आणण्यासाठी सासू-सासर्‍याने पाठवले हेलिकॉप्टर आई-वडिलांचे छञ हरवलेल्या वधूचे आदरयुक्त स्वागत

वधूला लग्नस्थळी आणण्यासाठी सासू-सासर्‍याने पाठवले हेलिकॉप्टर आई-वडिलांचे छञ हरवलेल्या वधूचे आदरयुक्त स्वागत


धाराशिव: भूम तालुक्यातील पाथरूड येथील अस्मिता तिकटे ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी तिच्या लहानपणीच डोक्यावरील आई-वडिलांचे क्षेत्र हरपले मामाने सांभाळ केला आणि तालुक्यातीलच अंतरवालीच्या युवकाशी लग्न जुळवून या शेतकरी कन्येचा शुक्रवारी दिनांक 18 रोजी नळी वडगाव फाटा येथे विवाह सोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यासाठी सासरच्या मंडळींनी अस्मिताला पाथरूड येथून नळे वडगाव फाटा येथील विवाह विवाह स्थळी आणण्यासाठी चक्क   हेलिकॉप्टर पाठवत सर्व पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का दिला. 


अस्मिता ही भूम तालुक्यातील पाथरूड या मूळ गावची रहिवासी आहे. तिचा तालुक्यातील आकाश शिकेतोड याच्याशी शुक्रवारी विवाह सोहळा संपन्न झाला या माध्यमातून आई-वडिलांचे छञ हरपलेली एक अनाथ मुलगी शिकेतोड  घराण्याची सून झाली. मामा लहू दासू माने यांनी पालक म्हणून कन्यादान केले अतिशय भारावून टाकणाऱ्या या सोहळ्यासाठी अंतरवली येथील शेतकरी भास्कर सिकेतोड यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये चक्क नवरीसाठी हेलिकॉप्टर पाठवले अस्मिताची आई सुशीला व वडील केशव एकटे यांचे निधन झाले होते. या दोघांच्या मृत्यूने अस्मिताच्या डोक्यावरील छञ हरवले होते. मामा लहू दासो माने हे  सर्वसाधारण शेतकरी असताना यांनी अस्मिता हिचा लहानपणापासून सांभाळा करून पोटच्या मुलीप्रमाणे पालन पोषण करून तिचा विवाह थाटामाटात लावून दिला स्मिताच्या सासू-सासर्‍यांनीही यापुढील पालकत्व स्वीकारत  तिला हेलिकॉप्टर मधून लग्न स्थळी आनंदाने स्वागत केल्याचा क्षणाने सगळेच भारावून गेले होते.

Post a Comment

0 Comments