Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलीस अधिक्षकांना शिवीगाळ, कर्मचाऱ्याला धमकी; बीडचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे बडतर्फ

पोलीस अधिक्षकांना शिवीगाळ, कर्मचाऱ्याला धमकी; बीडचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे बडतर्फ



बीड (प्रतिनिधी) – बीड पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्यावर अखेर बडतर्फीची कारवाई झाली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने ही कठोर कारवाई करत नागरगोजे यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. यामुळे पोलीस दलात  एकच खळबळ उडाली आहे.

सुनील नागरगोजे हे परभणी येथे कार्यरत असताना बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली होती. त्यानंतर बीड येथे नियुक्तीच्या काळातही त्यांनी एका कार्यालयीन कर्मचाऱ्याला धमकी दिली होती. याशिवाय, नागरगोजे सतत गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी होत्या. ते वारंवार 'सिक लीव्ह'वर जात असत आणि वर्ष-वर्ष कर्तव्यावर अनुपस्थित राहत होते.

त्यांच्या या गैरवर्तणुकीचा अहवाल तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. संबंधित प्रकरणात काही सुनावण्याही झाल्या. अखेर सर्व प्रकरणाचा आढावा घेत पोलीस महासंचालक कार्यालयाने नागरगोजे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली.

Post a Comment

0 Comments