Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षण पंढरी हादरली : चाकुर तालुक्यात ड्रग्स कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

शिक्षण पंढरी हादरली : चाकुर तालुक्यात ड्रग्स कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी


लातूर: पुण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने चाकूर तालुक्यातील रोहिना शिवारात छापा मारून एका पत्र्याच्या शेडमध्ये अंमली पदार्थ ड्रग्स बनवण्याचे व साठवण्याचे साहित्य जप्त केले यावेळी घटनास्थळावरून 11.36 किलोग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले असून त्याचे बाजार मूल्य 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या धक्कादायक घटनेने ड्रग्स अंमली पदार्थ असे शब्दच ऐकून असलेली लातूर ही शिक्षणाची पंढरी आता भलत्याच प्रकरणात चर्चेत आली आहे ; दरम्यान या प्रकरणात पाच आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून मुंबई स्थित अन्य दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले अटकेतील आरोपींना अधिक तपासासाठी अंमली पदार्थविरोधी पथक मुंबई पुण्याला घेऊन गेल्याचे लातूर पोलिसांकडून सांगण्यात आले.

गेल्या चार दशकापासून लातूर हे शहर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते शिक्षणातील लातूर पॅटर्न जगभर गाजत असतानाच गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या क्षेत्रातील घटनांनी लातूर भलत्या चर्चेत आले असतानाच अंमली पदार्थ तस्करी अशा बातम्या वाचून असलेल्या लातूर शहराचे कनेक्शन आता थेट मायानगरी मुंबईतील ड्रग्स प्रकरणाशी जोडले गेले आहे. रोहिना तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील सुपुत्र प्रमोद केंद्रे हा मुंबईत पोलिसात कार्यरत असल्याने त्यांचा मुंबईतील अंमलि पदार्थ मायाजालाशी संपर्क आला झटपट श्रीमंताच्या नादात त्याचे हात या गैरकत्यात अडकले त्याच्यावर व त्याच्या काही साथीदारावर अंमली पदार्थ विरोधी पथकाची पाळत होती. मंगळवारी पुण्याची अंमली पदार्थविरोधी पथकाने पाच आरोपीसह रोहिना शहरात एका पत्र्याच्या शेडवर छापा मारून अंमली पदार्थ बनवणे व साठवण्याचे साहित्य जप्त केले या कारवाईनंतर परतत असताना एक आरोपीने पोलिसाच्या गाडीची स्टेरिंग फिरवून पळून जाण्यासाठी केलेल्या प्रयत्नात गाडीला अपघात झाला आणि या प्रकरणाचे भिंग फुटले.

प्रमोद केंद्रे राहणार रोहिना जिल्हा लातूर, जुबेर हसन मातकर राहणार रोहा जिल्हा रायगड,( मोहम्मद अस्लम खान ,खाजा शफिक मोमीन तिघे राहणार मुंबई )या पाच आरोपींना या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील अन्य दोन आरोपी  फरार आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केली जाण्याची  सूत्राने माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments