Hot Posts

6/recent/ticker-posts

कुंपणच शेत खातंय..! लातूर ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाइंड निघाला पोलीसवालाच , ड्युटी करायचा पोलिसाची; काम मात्र गुन्हेगारीचे! शेतातच थाटला कारखाना-Latur Drugs police Accuse Arrest

कुंपणच शेत खातंय..! लातूर ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाइंड निघाला पोलीसवालाच , ड्युटी करायचा पोलिसाची; काम मात्र गुन्हेगारीचे! शेतातच थाटला कारखाना


लातूर: धाराशिव जिल्हा पाठोपाठ आता लातूर जिल्ह्यातील ड्रस माफिया चे भिंग उघडे पडायला लागली आहेत धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्स माफिया हे राजकीय पुढाऱ्याचे कार्यकर्ते निघाले तर लातूर जिल्ह्यात चक्क पोलीस खात्यातील कर्मचारीच गुन्हेगाराशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून शेतात कारखाना थाटून हा अवैध धंदा चालू केला आहे.  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात डिटेक्टिव्ह ब्रांच अर्थात डीबी पथकात वेगवेगळे गुन्हा यांची उकल करत असताना गुन्हेगारींशी आलेला संबंध आणि ड्रग्स मार्केटची माहिती घेत पोलीस खात्यातच कर्तव्य बजावत असलेल्या प्रमोद केंद्रेच्या पराक्रमामुळे लातूर जिल्हा हादरून गेला आहे मुंबईत ड्रग्सला मार्केट तर आहे पण माल बनवायचा कुठे यावर पर्याय शोधत केंद्रे यांनी गावाकडच्या शेतीचा पर्याय शोधला पत्र्याच्या शेडमध्ये सर्व यंत्रणा उभा केली.

याबाबत अधिक माहिती अशी की प्रमोद केंद्रे हा मूळचा चाकूर तालुक्यातील रोहिना गावचा रहिवाशी आहे तो मुंबईच्या मिरा-भाईंदर येथील पोलीस खात्यात डीबी पथकात होता. ड्रस प्रकरणातील तपासात त्याचा गुन्हेगारी संबंध आला. यातूनच त्यांनी ड्रज निर्मिती आणि मार्केटच्या साखळीची माहिती जाणून घेतल्याचे सांगितले जात आहे.  ड्रग्सचा  धंदा उभारण्यासाठी केंद्रे यांनी गुन्हेगारांशीच मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले एवढेच नाही तर हा उद्योग उभारण्यासाठी त्यांनी सात ते आठ जणांची टोळी ही तयार केली मुंबईहून गावाकडे कच्चामाल आणायचा आणि दुर्गम भागात असलेल्या शेतात ठेवायचा याच ठिकाणी ड्रग्स बनवण्याची साहित्य त्यांनी जमा केली होती ड्रस बनवणे रोजचे काम नाही तर दर पंधरा दिवसातून एकदा तिथे जाऊन चक्कर मारायचा.  ड्रग्स  बनवण्याचा त्याचा पहिला प्रयत्न तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे फसलाही होता दुसरा प्रयत्न सुरू असताना हे सर्व प्रकरण त्याच्या अंगलट आले रात्रीतून श्रीमंत होण्याच्या नादात पोलीस खात्याला काळीमा फासला जाईल अशी कृती प्रमोद केंद्रीने तर केलेच आहे पण संबंध जिल्हा या प्रकरणामुळे हादरला आहे. आज एखादी घटना घडली तर पहिले न्यायाचे ठिकाण म्हटले तर पोलीस स्टेशनचे दार आठवते मात्र याच पोलीस प्रशासनातील असे कर्तव्य शून्य अधिकारी गुन्हेगारांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून असे गोरखधंदे तिथे चालवत असतील तर सर्वसामान्यांना हे प्रशासन काय न्याय देणार असा सवाल सुजान नागरिकांतून उपस्थित होत आहे. त्यामुळे कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे करायची अशी चर्चा सर्वत्र रंगात आहे तर प्रकरणातील सात आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुन्हेगारी आढावा बैठकीत ही उमटली पडसाद

जिल्ह्यातील गुन्ह्या संबंधात महिन्याला येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला जातो गुरुवारी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आढावा घेतला चाकूर तालुक्यात घडलेल्या या घटनेचे अनुषंगाने सतर्क राहण्याचा सूचना केली आहेत या टोळीला जिल्ह्यातून कोणी मदत करत होते का याचाही शोध घ्यावा असाही सूर या बैठकीत उमटला.

Post a Comment

0 Comments