🅾️ बारावीचा निकाल जाहीर, ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही कोकण विभागाची बाजी
मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमधील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल आज, सोमवारी ऑनलाइन जाहीर होणार आहे. हा निकाल मेच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात लागेल, अशी चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी सकाळी निकालाची तारीख जाहीर केली.बारावीचा निकाल जाहीर, ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही कोकण विभागाची बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. यंदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Maharashtra 12th result 2025 division wise: विभागनिहाय निकालाची टक्केवारी -
विभाग- टक्केवारी
कोकण- ९६.७४
कोल्हापूर- ९३.६४
मुंबई- ९२.९३
छत्रपती संभाजीनगर- ९२.२४
अमरावती- ९१.४३
पुणे- ९१.३२
नाशिक- ९१.३१
नागपूर- ९०.६२
लातूर- ८९.४६
: मुलींची नेहमीप्रमाणे बाजी -
12th HSC Result 2025 : मुलींनी नेहमीप्रमाणेच मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याचा अर्थ या विषयांमध्ये परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच, १९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी घटली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के होता. यावर्षी तो ९१.८८ टक्क्यांवर आला आहे.
Maharashtra HSC Result 2025 LIVE: १०० टक्के गुण कुणालाच मिळाले नाहीत.
१९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहेत.
४५६२ कॉलेजचा निकाल ९० ते ९९.९९
३८ कॉलेजचा निकाल ० टक्के लागला आहे.
यंदाही मुलींची बाजी- राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 91.88 टक्के आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 96.740टक्के लागला, तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46 टक्के लागला. नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली
लातूर पॅटर्न यंदा फेल:
यंदा 'लातूर पॅटर्न' फेल, कोकण विभागाने मारली बाजी;
0 Comments