कळंबमध्ये उभारणार 'स्क्वैश कोर्ट', खेळाडूंसाठी ठरणार मैलाचा दगड - आमदार कैलास पाटील

Hot Posts

6/recent/ticker-posts

कळंबमध्ये उभारणार 'स्क्वैश कोर्ट', खेळाडूंसाठी ठरणार मैलाचा दगड - आमदार कैलास पाटील

कळंबमध्ये उभारणार 'स्क्वैश कोर्ट', खेळाडूंसाठी ठरणार मैलाचा दगड - आमदार कैलास पाटील 



धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे . 16: कळंब शहरातील क्रीडा संकुल येथे अतिशय दर्जेदार व अद्ययावत स्क्वैश कोर्टची उभारणी आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकारातून होत आहे. (ता. 16) रोजी या कोर्टच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. या कोर्टमुळे सामान्य खेळाडूंना मोठा फायदा होणार असून व नवीन खेळाडू तयार होण्यास मदत मिळणार आहे. 

स्क्वैश हा दोन खेळाडूंनी खेळला जाणारा एक रॅकेट खेळ आहे .यात खेळाडू एका बंदिस्त कोर्टमध्ये समोरच्या भिंतीवर चेंडू मारण्याचा प्रयत्न करतात आणि प्रतिस्पर्ध्याला तो परत मारणे आवश्यक असते .हा खेळ शारीरिकदृष्ट्या तगडा आणि जलद असतो. स्क्वैशचा सामना साधारणपणे पाच गेम्स पैकी सर्वोत्तम असतो .म्हणजे जो खेळाडू तीन गेम जिंकतो तो सामना जिंकतो. एक उत्कृष्ट हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी व्यायाम आहे .या खेळामध्ये वसुंधरा नांगरे हिची एशियन गेम्स स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच जिल्हास्तरावर 650 खेळाडू ,विभाग स्तरावर 200 खेळाडू, राज्यस्तरावरती 700 खेळाडू, राष्ट्रीय स्तरावरती 17 खेळाडूंनी, प्राविण्य प्राप्त केलेले आहे. जिल्ह्यात खेळाडू देशभर वेगवेगळ्या खेळात चमकत आहेत. पारंपारीक खेळाकडं जसे खेळाडू आकर्षित होतात अगदी त्याचप्रमाणे अश्या वेगळ्या खेळात देखील आता खेळाडू वळत आहेत. तेव्हा अश्या खेळाडूच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्याचा विचार करून आमदार कैलास पाटील यांनी हे कोर्ट उभारणी करिता पुढाकार घेतला आहे. 

त्याचबरोबर क्रीडा संकुल चे प्रवेश द्वार ची दुरुस्ती, संरक्षण भिंतीची दुरुस्ती, पाण्याची व्यवस्था व इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत.सोमवारी त्याच्या भूमिपूजनाचा उदघाटन सोहळा पार पडला.साधारण अडीच कोटीच्या निधीतून उभारण्यात येणार हे अद्ययावत कोर्ट खेळाडूंना मैलाचा दगड ठरेल असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे.



यावेळी तहसीलदार हेमंत ढोकळे, उपभियंता वायकर,दिलीप बापू पाटील, प्रदीप बाप्पा मेटे,संजय मुंदडा,सचिन काळे,सागर मुंडे, मनोहर धोंगडे,संदीप पालकर, मेघराज मुंडे,संजय जी मुंदडा,शंकर वाघमारे, श्याम नाना खबाले,रुकसाना भाभी,प्रतीक गायकवाड, मंदार मुळीक, जिलानी कुरेशी, नदीम मुलानी, सागर मुंडे, नाना थळकरी,गोविंद चौधरी प्रदीप फरताडे,विकास हौसलमल, रणजीत टेकाळे, राहुल पाटील,पंडित देशमुख, संतोष लांडगे,सुभाष बापू चोंदे,  आबासाहेब मुळीक,निखिल कापसे, शशिकांत पाटील, मेघराज मुंडे,रितेश लंगडे, सागर लोमटे तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments