Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिवमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात शासन आदेशाची होळी; 'मराठी माणूस' रस्त्यावर

धाराशिवमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात शासन आदेशाची होळी; 'मराठी माणूस' रस्त्यावर


धाराशिव /प्रतिनिधी – महाराष्ट्रात राज्य सरकारकडून हिंदी भाषा सक्तीने लादण्याच्या निर्णयाविरोधात धाराशिवमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. ‘माय मराठी’च्या गळचेपीचा निषेध करत रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासन आदेश (GR) ची होळी करण्यात आली.

‘मराठी जगवू, मराठी वाढवू, मराठी बोलू’, ‘मराठी आमुची मायबोली’, अशा जोरदार घोषणा देत मराठी भाषिक नागरिकांनी शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.‘तमाम महाराष्ट्रप्रेमी मराठी जनता धाराशिव’ या मंचाच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

 या आंदोलनात नितीन तावडे, राजेंद्र अत्रे, भारत इंगळे, बालाजी तांबे, लक्ष्मीकांत जाधव, रवींद्र केसकर, दौलत निपाणीकर, माधव इंगळे, सुनील बडूरकर, महेश पोतदार, राजेंद्र गपाट, संतोष हंबीरे, सुधाकर तांबे, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, दादा कांबळे, शीला उंबरे, मयूर काकडे, जमीर शेख, शेखर घोडके, रणवीर इंगळे, दिनेश बंडगर, रवी वाघमारे, प्रदीप मेटे, सचिन काळे, मनोहर धोंगडे, पंडित देशमुख, सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, रोहित बागल, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, सरफराज काझी, दीपक जाधव, राणा बनसोडे, सिद्धेश्वर कोळी, गणेश असलेकर, निलेश जाधव, राहुल बचाटे, पाशा शेख, कुणाल महाजन, शौकत शेख, अबरार कुरेशी, पंकज पाटील, संजय भोरे, अजिंक्य राजेनिंबाळकर,बंडू आदरकर, सुरेश गवळी, राकेश सूर्यवंशी, अशोक बनसोडे, अभिमान पेठ, ॲड. जावेद काझी, अंकुश पेठे, संजय जगधने, धवलसिंह लावंड, ॲड.गणपती कांबळे, अभिराज कदम, सतीश लोंढे, राज निकम, सह्याद्री राजेनिंबाळकर, शिवयोगी चपने, मनोज पडवळ, कालिदास शेरकर, अमर गुंड, प्रा.तुषार वाघमारे, राकेश कचरे, नितीन राठोड, अभिजीत देशमुख, यशवंत शहापालक, प्रसाद राजेनिंबाळकर, प्रवीण केसकर, अमोल मुळे, हर्षद ठवरे, तुषार जोगदंड, अनिल राठोड, बाळासाहेब पोतदार, कुणाल कर्णवर आदी मराठी माणसं सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments