धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे इंटक जिल्हा कार्यालय व महिला पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान
तुळजापूर(प्रतिनिधी)/रुपेश डोलारे : राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी संजीवा रेड्डी यांच्या व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.कैलास भाऊ कदम, यांच्या आदेशावरून धाराशिव जिल्हा इंटक कार्यालय तुळजापूर येथे उद्घाटन करण्यात आले दि.27 -7-2025 रोजी दुपारी 2.30 वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये संघटित व संघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक धाराशिव जिल्ह्याच्या महिला पदाधिकार्यांची निवड करुन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
पदाधिकार्यांना मार्गदर्शन करतांना काँग्रेस-इंटक बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले ,(इंटक) संघटने विषयी सविस्तर माहिती देतांना ते म्हणाले, संघटीत, असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी इंटक सदैव तत्पर असते. कामगारांनी आपल्या अडीअडचणी, समस्या सोडवून घेण्यासाठी इंटकमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करुन इंटक महिला पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी सर्व सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक जिल्हा कार्यालय याचा उपयोग सर्व संघटित व अ संघटित कामगारांना व मजदूर यांना योग्य न्याय कसा देण्यात येईल याच्यावर चर्चा करून राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक विषय सविस्तर मार्गदर्शन करून धाराशिव जिल्ह्यातील महिलां आणि
संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना महाराष्ट्र मजदूर कांग्रेस (इंटक) धाराशिव जिल्ह्याच्या महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
बीड जिल्ह्याचे राष्ट्रीय मजूर काँग्रेस इंटक चे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री मधुकर शेळके, महिला आघाडी प्रमुख पूनम कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.तसेच तुळजापूर तालुका अध्यक्ष महिला आघाडी प्रियांका कदम, तालुका उपाध्यक्ष ताई दयानंद राठोड, कोषाध्यक्ष छाया जयवंत भोसले, तालुका सचिव श्रद्धा राठी यांची निवड करण्यात आली.तरी यावेळी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक चे जिल्हा सचिव किरण यादव, जिल्हा युवक अध्यक्ष प्रशांत इंगळे, अनिल शिंदे, बापू माळी, विकास हावळे, रवींद्र लगाडे, निरंजन हटकर सो.सुरेखा पवार सामाजिक कार्यकर्ते. तालुका सचिव सुहास कानडे. पांडुरंग चव्हाण हरी सुरवसे सत्यजित चव्हाण विकास घोडके, रोहित शेंडगे, सो.मोनिका कदम धाराशिव जिल्ह्यातील संघटित व असंघटित राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक चे सर्व पदाधिकारी यावेळी इत्यादी उपस्थित होते.
0 Comments