तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील विनापरवाना डिजिटल फ्लेक्स काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन अन्यथा उपोषण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष बबनराव गावडे यांचा इशारा.
तुळजापूरचे/प्रतिनिधी -रूपेश डोलारे -शहरातील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विनापरवाना डिजिटल व कट आउट काढणे बाबत व कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया प्रमुख बबनराव गावडे यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदन निवेदनाद्वारे मागणी करून एक दिवशीय लाक्षणीक उपोषणाचा इशारा दिला आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की देशाची आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुड पुतळा रात्रीच्या वेळेस तुळजापूर मध्ये येणाऱ्या शिवभक्तांना स्पष्ट दिसावा व महाराजांची दर्शन घेता यावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खांबाला लॅम्प लावण्यात आलेला आहे परंतु लावलेल्या खांबापुढे राजकीय फ्लेक्स उभा केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पष्टपणे पुतळा पर राज्यातून राज्यातून येणाऱ्या शिवभक्तांना दिसून येत नाही. त्यांना अंधमय स्थितीतच पुतळा पहावा लागत आहे दर्शन घ्यावे लागत आहे नगरपालिका प्रशासन यांना वारंवार सांगून देखील विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फ्लेक्स उभा करणारे एजन्सी मुद्दाम तुळजापूर शहरात वातावरण व कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे ज्यांचे राजकीय नेत्यांची फ्लेक्स आहेत त्यांना याची माहिती नसते कल्पनाही नसते फ्लेक्समुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत प्रकाश पोहोचत नाही तरी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कायमस्वरूपी फ्लेक्स कट आउट लावण्याची बंदी घालावी.
हायकोर्टाच्या निर्देशानुसार शहरातील महत्त्वाच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा किंवा अन्य महत्वाचे पुतळे असलेल्या चौकामध्ये 50 मीटर मध्ये फ्लेक्स कट आउट लावण्यात मनाई असताना तुळजापूर शहरातील फ्लेक्स डिजिटल वाले व त्यांचे कर्मचारी जाणून बुजन भर चौकामध्ये विनापरवाना फ्लेक्स कट आउट लावून तुळजापूर शहरातील वातावरण बिघडवत कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे.
तुळजापूर शहरामध्ये डिजिटल फ्लेक्स बनवणाऱ्या एजन्सीला प्रशासनाकडून नोटीसा देऊन चौकामध्ये डिजिटल कट आउट उभारण्यावर बंदी घालावी फ्लेक्स एजन्सी विना परवाना लावलेले आहे त्यांच्यावर कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी बेकायदेशीर उभा केलेली साहित्य जप्त करावी अशी विनंती केली आहे.
याबाबत आपण सोशल मीडिया तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या व्हाट्सअप नंबर वर कारवाईबाबत मेसेज करून देखील याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही. एवढेच नाही तर भर चौकामध्ये बेकायदेशीरपणे उभा केलेल्या फ्लेक्स कट आउट चा आधार घेऊन काही व्यक्ती लोक लघुशंका छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील वॉल कंपाऊंड जवळ केल्याचे दिसून येत आहे .ही एक प्रकारची विटंबना आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा व मेन गेट छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज चौक येथे फ्लेक्स कट आउट उभा करण्यावर ताबडतोब बंदी घालावी कटआउट ,डिजीटल फ्लेक्स उभा करणारे एजन्सीवर व कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात याविषयी विनंती
मुख्याधिकारी रणदिवे साहेब व अतिक्रमण विभाग यांना निदर्शनास आणून देखील गांभीर्यपूर्वक दखल घेतली नसल्यामुळे प्रशासनाचा निश्चित करण्यासाठी आपण येत्या 15 ऑगस्ट रोजी हायकोर्ट खंडपीठात संभाजीनगर येथे एकदिवशीय लाक्षणीक उपोषण करणार आहोत संबंधित फ्लेक्स एजन्सींना कायदेशीर नोटीस काढून त्यांना प्रतिबंध नाही घातल्यास व गांभीर्यपूर्वक याबाबत दखल नाही घेतल्यास प्रशासन म्हणून मुख्याधिकारी साहेब व अतिक्रमण विभाग जबाबदार राहील असे निवेदनात नमुद केले आहे.
0 Comments