दुर्दैवी घटना: पंढरपुरात चंद्रभागेत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू-
सोलापुर/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन जालना जिल्ह्यातून आलेल्या तीन महिला भाविकांचा चंद्रभागेच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी सकाळी सात वाजता सुमारास ही दुर्दैवी घटना घडली या घटने सोबत आलेल्या अन्य नातेवाईक महिलांनी हंबरडा फोडला.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की संगीता संजय सपकाळ वय (40) व सुनिता माधव सपकाळ वय (45) दोघी राहणार धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना(Jalna) अशी मयत झालेल्या दोन महिला भाविकांची नावे आहेत. अंदाजे 60 वर्षे वयाच्या तिसऱ्या मयत महिलेची ओळख पटलेली नाही जालना जिल्ह्यातील काही भाविक मिळून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येथे आली होती शनिवारी सकाळी लवकर चंद्रभागेत(Chandrabhaga Nadi) स्नान करून ते दर्शनाला जाणार होते त्यानुसार सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भक्त पुंडलिक मंदिराजवळील नदी पात्रात स्नानासाठी गेले. उजनी धरणातून गेल्या काही दिवसापासून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे येथील चंद्रभागेचे पात्र भरून वाहत आहे त्यातच कडेला उतरून स्नान करत असताना अचानक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील संगीता सपकाळ व सुनिता सपकाळ या दोघी बुडाल्या.
हा प्रकार लक्षात येताच इतर भाविकांनी आरडाओरड केली नदीपात्रात बुडालेल्या दोघींना बाहेर काढण्याचे प्रयत्नही चालवले मात्र पाण्याला वेग असल्याने दोघीही बुडून पुढे वाहून गेल्या स्थानिक होडी चालकाने तात्काळ मदतीला नदीपात्रात सर्वत्र शोधा सूत सुरू केली. अखेर सकाळी 9:00 च्या सुमारास एक आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या महिलेला शोधून बाहेर काढण्यात यश आले तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या दरम्यान कासार घाट येथील संत भानुदास महाराज मठाजवळील नदीपात्रातही अंदाजे 60 वर्षे वयाची महिला भावी स्नान करत असताना खोल पाण्यात बुडाली काही क्षणात ती महिलाही वाहून गेल्याने दूरपर्यंत शोधा शोध सुरू करण्यात आली अखेर दुपारी या तिसऱ्या महिलेचाही मृतदेह हाती लागला मात्र या महिलेची ओळख पटत नव्हती तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले आहे.
आपत्कालीन यंत्रणा गायब
नुकताच पार पडलेल्या आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन करताना चंद्रभागा नदीपत्रात वाहत्या पाण्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली होती नदीपत्रात बोट तसेच प्रशिक्षित कर्मचारी 24 तास त्यांनी ठेवली होती या सोबतच स्थानिक सर्व होडी चालकाकडे भाविकांसाठी जीवरक्षक जॅकेट ठेवले होते सध्या चंद्रभागा दुथडी वाहत असतानाही यात्रा संपताच आपत्कालीन यंत्रणा मात्र गायब झाल्याचे दिसून येत आहे.
विठुरायाच्या दर्शनाची आस अधुरीच
तीर्थक्षेत्र पंढरपुरात(Pandharpur) दाखल झालेली भाविक अगोदर येथील चंद्रभागेस पवित्र स्नान करतात आणि त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात त्यानुसार जालना जिल्ह्यातून शुक्रवारी येथे आलेले भाविक शनिवारी सकाळी लवकर उठून चंद्रभागे स्नानासाठी गेले स्नानानंतर ते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणार होते तत्पूर्वी स्नान करताना जालना जिल्ह्यातील दोघीसह एकूण तीन महिला भाविकांचा चंद्रभागेत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या विठुरायाच्या चरणी लीन होण्याची अधुरीच राहिली याविषयी स्थान तसेच बांधकाम मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments