Hot Posts

6/recent/ticker-posts

बीडमध्ये सैराट : प्रेम संबंधातून तरुणाला प्रेयसीच्या नातेवाईकांकडून बेदम मारहाण, उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू -Sairat in Beed: love Affair young man died

बीडमध्ये सैराट : प्रेम संबंधातून तरुणाला प्रेयसीच्या नातेवाईकांकडून बेदम मारहाण, उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू -


बीड /प्रतिनिधी रुपेश डोलारे : जिल्ह्यात आणखी एक भयंकर घटना घडली आहे. एका मुलीसोबत प्रेमसंबंध (love affair)असलेल्या तरुणाची तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सैराट चित्रपटातील आठवणी जाग्या झाले आहेत. १५ जुलै रोजी तरुणीने त्याला घरी कुणीच नसल्याने भेटायला बोलावले होते. तो गेला, तेव्हा तिथे तरुणीचे नातेवाईक आले आणि त्यांनी त्याला पकडले. त्यादिवशी इतरांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. पण, त्यानंतर तिसऱ्याच दिवशी मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी त्याला रस्त्यात गाठलं आणि बेदम मारलं. छत्रपती संभाजीनगर येथील एका कॉलेजमध्ये(colleage) इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या शिवम चा या मारहाणी त उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी(gangavadi) येथे ही घटना घडली. २१ वर्षीय शिवम चिकणे या तरुणाला प्रेमसंबंधाच्या कारणावरून पाच जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली. 

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवमवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी त्याचा   उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात तलवाडा पोलिस ठाण्यात आधी जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा (offence)दाखल झाला होता. आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेबाबत  शिवमचे वडील काशीनाम चिकणे यांच्या माहितीनुसार मुलगा शिवम हा माजलगाव(majalgaovn) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते.१५ जुलै रोजी प्रेयसी एकटी असताना तिने शिवमला घरी बोलावले होते. त्यावेळी तिचे दोन नातेवाईक शिवम गणेश यादव आणि सत्यम मांगले हे तिथे आले व त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. गावकऱ्यांनी तो वाद सोडवलाही होता. त्यानंतर १८ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता काशीनाम चिकणे शेतात असताना त्यांना मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. ते तत्काळ गेवराई येथील खासगी रुग्णालयात पोहोचले असता, शिवम बेशुद्धावस्थेत आढळला. ज्ञानदेव चिकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजता शिवम दुचाकीवरून (motarcyle)जात असताना, शिवम गणेश यादव याने त्याची गाडी अडवून शिवीगाळ केली. त्यावेळी गणेश सुखदेव यादव, राजाभाऊ उत्तम यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव हेही तिथे आले. त्यांनी शिवम यादव, सत्यम मांगले आणि राजाभाऊ यादव यांनी लाठ्या-काठ्यांनी, तर गणेश सुखदेव यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव यांनी हाता-बुक्क्यांनी मारहाण केली होती. जखमी शिवमवर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु शनिवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी मुलीच्या वडिलाला तलवाडा पोलिसांनी अटक केली आहे, इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामाही केला.या प्रकरणात अगोदरच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंद आहे. मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता यात खुनाचे कलम वाढवणार असल्याचे उपनिरीक्षक (Api)स्वप्निल कोळी यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढीचं चिंताजनक वास्तव

बीड जिल्ह्यात अशा प्रकारचे वारंवार गुन्हे सातत्याने समोर येत आहेत. कधी ऑनर किलिंग, कधी बलात्कार, तर कधी दरोडे. प्रशासनाने गुन्हेगारीवर कडक कारवाई केली नाही, तर जिल्ह्याचं नाव गुन्हेगारीसाठी ओळखलं जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी या प्रश्नावर एकत्र येऊन ठोस भूमिका घेतली पाहिजे.

Post a Comment

0 Comments