कृषिमंत्री दत्तात्रय भरणे धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आज करणार पाहणी
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे– मागील आठवड्यात जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून यामध्ये जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज दि. १६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
असा असेल धाराशिव दौरा कार्यक्रम
भरणे यांचा पुणे–इंदापूर–धाराशिव हा सुधारित दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता इंदापूर येथून कुर्डुवाडी, बार्शी, येरमाळा मार्गे वाशी (जि. धाराशिव) कडे प्रयाण करतील.दुपारी ३.३० वाजता वाशी येथे आगमन करून शहर व लगतच्या परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी कृषिमंत्री करतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार राहुल भैय्या मोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव असलकर उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सायं. ५.३० वाजता भरणे वाशी येथून पुन्हा इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे प्रयाण करतील. रात्री ८ वाजता तेथे पोहोचून मुक्काम करतील. माजी कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजनाम्या नंतर आता नव्याने रुजू झालेले कृषिमंत्री दत्तात्रय कोकाटे पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करत आहेत व नुकसानचा आढावा घेणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कृषिमंत्री भरणे यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावामध्ये या मुसळधार पावसामुळे अनेकांची पिके पाण्यात गेली आहेत तर, अनेकांच्या जमिनीकडून खरडून गेले आहेत, एकंदरीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पाहणी करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
0 Comments