देवदर्शनासाठी जाणाऱ्या सहा तरुणावर काळाचा घाला, पेंडगाव येथे दर्शनासाठी पायी जाताना कंटेनरने तरुणांना चिरडले बीड जिल्ह्यातील घटना-
बीड/प्रतिनिधी रूपेश डोलारे : धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरियर वाहतूक करणाऱ्या भरधाव कंटेनरने एन एल 01 YG 3197 पेंडगाव येथे दर्शनासाठी निघालेल्या सहा तरुणांना चिरडले; या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांनी उपचार दरम्यान प्राणज्योत मालवली हा भीषण अपघात शनिवारी सकाळी दि,३० रोजी साडेसात वाजता बीड तालुक्यातील नामलगाव फाटा परिसरात घडला कंटेनरच्या बीड ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.ऐण गौरी गणपतीच्या सणामध्ये या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे मयत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की दिनेश दिलीप पवार वय 25( राहणार माऊली नगर बीड) पवन शिवाजी जगताप वय 25 (राहणार आंबीका चौक बीड) अनिकेत रोहिदास शिंदे (रा.शिदोड तालुका बीड) किशोर गुलाब तौर (राहणार बाबुल्तारातालुका गेवराई )आकाश अर्जुन कोळसे वय 25 राहणार (रिलायन्स पंप परिसर बीड )व विशाल श्रीकृष्ण काकडे वय 22( राहणार शेकटा तालुका शेगाव) अशी मयतांची नावे आहेत. बीड शहरात राहणारे सहा तरुण शनिवारी सकाळी पेंडगावला दर्शनासाठी पायी जात होते नामलगाव येथील उड्डाणपूल पास करून पुढे चालत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेरने तरुणाला चिरडले यात चौघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तसेच बीड ग्रामीण आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली कंटेनरच्या चरकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली आहे सदरील कंटेनर कुरिअर पार्सल घेऊन कर्नाटकातील हुबळी येथून कार्यालयाकडे जात होता. या अपघाताची माहिती मिळताच मयताची कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला त्यांचा हा आक्रोश पाहुन उपस्थित नागरीकही भावविवेश झाले होते.जिल्हा रुग्णालयात तरुणांचे मित्र नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातानंतर संतप्त नागरिकांमुळे नागरिकांनी धुळे सोलापुर महामार्गावरील पाडळशिंगी तालुका गेवराई येथील टोलनाका काही काळ बंद पडला यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी महामार्ग व बीड पोलिसांनी धाव घेत नागरिकांची समजूत काढले; दरम्यान दोन महिन्यापूर्वी सोलापूर धुळे - मार्गावर गढी गावाजवळ सहा तरुणांना भरधाव टेम्पो ने चिरडले होते वाढते अपघातामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असा घडला अपघात:-
अपघातात मृत्यू झालेले तरुण रस्त्याच्या बाजूने चालत होते त्यांच्या पाठीमागे काही अंतरावर एक वाहनचालक नजीकच्या हॉटेलमधून नाष्टा करून येत होता त्यांच्या मागे रस्त्याच्या बाजूने काही महिला पायी चालत होत्या भरधाव कंटेनरच्या चालकाने सुरुवातीला नाष्टा करून परतणाऱ्या वाहन चालकाला धडक दिली याच कंटेनर चे रबर त्यांच्या हाताला लागले आणि काही क्षणात पुढे चालणाऱ्या तरुणाला चिरडले

0 Comments