मौजे उमरगा चि. येथील विमलबाई जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन-
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
रामायणाची आवड असणाऱ्या विमलबाईने उभ आयुष्य राम सेवेसाठीच समर्पित केले.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (प्रतिनिधी):- तुळजापुर तालुक्यातील मौजे उमरगा चि. येथील रामायण प्रेमी विमलबाई उत्तम जाधव (वय ६४ वर्ष रा. उमरगा चि. ता. तुळजापुर जि. धाराशिव ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि.२२ ऑगस्ट रोजी रात्री वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. विमलबाई उत्तम जाधव या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या व त्या आक्का नावाने सर्वाँना परिचित होत्या.त्यांना लहानपणा पासूनच पारमार्थिक क्षेत्राची आवड पारायण सोहळा भजन पोथी पुराण यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा विशेष करून त्या रामभक्त होत्या गाव परिसरातील लक्ष्मण शक्ती ब्रह्मपत्र वाचन अशा कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहायच्या रामायाणावर नितांत प्रेम करणाऱ्या विमलबाई जाधव यांनी उभ आयुष्य राम कथा व राम सेवेसाठीच घालवल्या. रामभक्त असलेल्या विमलबाई उत्तम जाधव उर्फ आक्का यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने गाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments