मौजे इटकळ येथील इयत्ता सातवीतील फरहान इमाम चौधरी यांनी बीट स्तरीय स्पेलिंग स्पर्धेत मिळवला पहिला क्रमांक-Itkal-Tuljapur school News

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथील इयत्ता सातवीतील फरहान इमाम चौधरी यांनी बीट स्तरीय स्पेलिंग स्पर्धेत मिळवला पहिला क्रमांक-Itkal-Tuljapur school News

मौजे इटकळ येथील इयत्ता सातवीतील फरहान इमाम चौधरी यांनी बीट स्तरीय स्पेलिंग स्पर्धेत मिळवला पहिला क्रमांक-


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने फरहान चौधरी याचा करण्यात आला सन्मान.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ(Itkal) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक  शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कुमार फरहान इमाम चौधरी यांनी बीटस्तरीय स्पेलिंग 'बी 'स्पर्धेमध्ये अणदूर(Andur) बीट मधील सर्व शाळांमधून इयत्ता सातवीच्या वर्गातून (गटातून) प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या संकल्पनेतून इंग्रजी भाषा(English Language) विषय ज्ञान वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्यात स्पेलिंग उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी अणदूर येथे घेण्यात आलेल्या बीट स्तरीय स्पेलिंग बी (Spelling B) स्पर्धेत सातवीच्या गटातून फरहान इमाम चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला असल्याने मौजे इटकळ  येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या (Z.P.Centre School Itkal) वतीने सत्कार करण्यात आला.कुमार फरहान इमाम चौधरी यास शाळेचे मुख्याध्यापक तानाजी गायकवाड सर,ढोणे सर, बालाजी कदम, सुधाकर कांबळे, नागेश स्वामी सर , संगीता घुगे, सारिका इंगळे, जया भोसले,म्हमाणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. फरहान इमाम चौधरी यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल इटकळ गाव परिसरातून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments