खोट्या कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणाऱ्या मुलाची सेवा चार दिवसात समाप्त तर शिक्षिका आईचेही निलंबन सोलापूरचे सिओ कुलदीप जंगम यांचा दणका --
सोलापुर/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मध्यंतरी झालेल्या अनुकंपा भरतीत नियुक्ती घेताना अनुकंपाधारकाने कुटुंबातील कोणतेही सदस्य शासकीय सेवेत नसल्याचे हमीपत्र दिले होते मात्र संबंधित उमेदवाराची आई जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असल्याचे बाब तपासात उघड झाली; त्यामुळे कंत्राटी ग्रामसेवक म्हणून अनुकंपातून भरती झालेल्या मुलाची सेवा समाप्त करण्यात आली आहे तर खोटी प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत व सेविका असणाऱ्या त्या मुलाच्या आईचे निलंबन करण्यात आले आहे तसे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहेत.
खोट्या प्रतिज्ञा पत्राच्या (Affidit) आधारे अनुकंपाच्या माध्यमातून मुलाला नोकरी मिळवण्याच्या खटाटोपात उपशिक्षिका असणाऱ्या आईची नोकरी गेली तर कंत्राटी ग्रामसेवक(Gramsevak) म्हणून सेवेत आलेल्या मुलाला अवघ्या चार दिवसात सेवा गमवावु लागली या प्रकारामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची थोडक्यात अशी हकीगत अशी की मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या भोजप्पा विठ्ठल कोळी यांचे 2 ऑगस्ट 2011 रोजी निधन झाले 24 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या अनुकंपा भरती प्रक्रिया त्यांच्या जागी त्यांचा मुलगा अविनाश भोजप्पा कोळी याला कंत्राटी ग्रामसेवक या पदावर अक्कलकोट येथे नियुक्त करण्यात आली होती. अनुकंपा नियुक्ती देताना लाभार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य शासकीय सेवेत नसल्याचे हमीपत्र लिहून द्यावी लागते असे असताना सुजाता भोजप्पा कोळी यांनी कुटुंब निवृत्ती वेतन घेण्यासाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्या उपशिक्षिका म्हणून शासकीय सेवेत असल्याची नमूद केली आहे तर अनुकंपा नियुक्तीसाठी शासकीय सेवेत कोणीही नसल्याचे प्रतिज्ञापत्र सुजाता कोळी व कुटुंबातील इतर सदस्यांनी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केली होती
ममंगळवेढा (Mangalvedha)तालुक्यातील नंदुर जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षिका म्हणून सध्या कार्यरत असणाऱ्या सुजाता भोजप्पा कोळी पूर्वाश्रमीच्या रकमाबाई कल्लाप्पा सुसलादी यांनी शासनास खोटी माहिती देऊन मुलगा अविनाश भोजप्पा कोळी याला अनुकंपा नियुक्ती प्राप्त करून दिली असाच ठपका ठेवत जिल्हा परिषद शिस्त अपील १९६४ मधील नियम 3 नुसार सदर उपशिक्षकीचे सेवेतून निलंबन करण्यात आले आहे तसे आदेश 4 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली आहेत शासनाची फसवणूक करून अनुकंपाद्वारे नोकरी मिळवण्याचा ठपका ठेवत 28 जुलै रोजी अविनाश कोळी यांची सेवा समाप्त करण्यात आली. या प्रकरणामुळे प्रशासकीय विभागांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर खोटे प्रमाणपत्र : स्मिता पाटील
अनुकंपा भरतीचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील कोणत्याही सदस्य शासकीय सेवेत नसावा हा नियम आहे मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात आई सुजाता भोजप्पा कोळी या उपशिक्षिका म्हणून कार्यरत असताना अविनाश भोजप्पा कोळी या उमेदवाराने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर(Stamp paper) खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले तर सुजाता कोळी यांनी कुटुंब निवृत्ती वेतन घेण्यासाठी दिलेल्या प्रतिज्ञा पत्रावर त्या उपशिक्षिका म्हणून शासकीय सेवेत असल्याचे नमूद केली आहे ही शासनाची सुद्धा फसवणूक आहे त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली आहे.
0 Comments