धाराशिव जिल्ह्यातील शाळांना 23 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहिर-
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे : जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नदी-नाले व ओढ्यांची पाणीपातळी वाढून अनेक रस्ते व पुलांवरून पाणी वाहत आहे. यामुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी ( वार मंगळवार ) सुट्टी देण्यात आलेली आहे.



0 Comments