अणदूर येथील जिल्हा युवा महोत्सवात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयास द्वितीय पारितोषिक
धाराशिव,प्रतिनिधी/ रूपेश डोलारे दि.१२ : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत शै वर्ष २०२५-२६ मध्ये अणदूर ता तुळजापूर,जि धाराशिव येथे जिल्हा स्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते,सदर युवा महोत्सवामध्ये प्रश्नमंजुषा सांघिक, लोक वाद्यवृंद वैयक्तिक स्पर्धांमध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथील द्वितीय पारितोषिक सहभागी विद्यार्थ्यांनी पटकावले,सदर स्पर्धांमध्ये माने ऋषीराज संदेश,केवट विवेक रामबरन,कोळी शिवम् लाला बी ए प्रथम वर्ष तसेच बोंदर सुदर्शन अमर बी कॉम भाग दोन,बोंदर ऋषिकेश अमर बी ए तृतीय वर्ष,कु सेजल गौतम कोचेटा ,बी एस्सी भाग एक,कु गौरी विजय सावळे,बी ए भाग एक, राहुल जाधव बी ए भाग एक आदी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला,सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे उप मराठवाडा विभाग प्रमुख मा प्राचार्य जयसिंगराव देशमुख,महाविद्यालयाचे प्रबंधक सुमेर कांबळे यांनी अभिनंदन केले व जानेवारी मध्ये होणाऱ्या केंद्रीय युवक महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.युवक महोत्सवासाठी प्रा डॉ बालाजी गुंड,प्रा विवेकानंद चव्हाण यांनी,प्रा डॉ स्वाती जाधव यांनी सहकार्य केले.



0 Comments