धाराशिव : महामार्गावरील चालत्या ट्रकवर चढून चोरी करणाऱ्या दरोडेखोराच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : महामार्गावर चालत्या वाहनावर चढून चोरी करणारे एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे ही टोळी दरोडाच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
ही मोठी कारवाई 9 सप्टेंबर रोजी करण्यात आली गेल्या काही दिवसापासून तेरखेडा परिसरात हायवे महामार्गावर जाणाऱ्या ट्रक मधून माल काढत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला पोलीस निरीक्षक विनोद इज्जतपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या पथकाने येरमाळा येथे गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली मलकापूर पाठीजवळ एक स्कार्पिओ गाडी थांबली असून त्यामधील व्यक्ती येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचुन छापा टाकला पोलिसांना पाहताच दोन आरोपी पळून गेली.
पण पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले गाडीतील इतर चौघांनाही जागीच ताब्यात घेऊन आले चौकशी अंती त्यानी आपली नावे अमोल काळे, किरण पवार, दत्ता काळे, गणेश काळे , सुभाष काळे आणि शिवा पवार अशी सांगितली हे सर्व तेरखेडा येथील रहिवाशी आहेत त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य निवांत जप्त करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकलेली दरोडेखोरांचाही टोळी पुण्यातील तब्बल 50 लाखाच्या दरोडेच्या गुन्हात फरार असल्याची पोलिसांच्या तपासातून उघड झाली आहे.

0 Comments