धाराशिव : शशिकांत मुळे यांची प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या तीन तालुका संपर्कप्रमुखपदी निवड
धाराशिव प्रतिनिधी/ रूपेश डोलारे – प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यांच्या संपर्कप्रमुखपदी शशिकांत मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रहार संघटनेचे जुने सहकारी असलेले मुळे यांनी पुन्हा संघटनेत प्रवेश केला असून जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या आदेशाने त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्षमहेश माळी, तुळजापूर तालुका समन्वयक कालू जाधव, धाराशिव , धाराशिव तालुका सचिव संजय कारभारी,कार्याध्यक्ष तडवळे शाखा भगवान होगले,धाराशिव तालुका उपाध्यक्ष दत्ता पवार अभिमान सगट यांच्यासह संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीनंतर शशिकांत मुळे यांनी विश्वास व्यक्त केला की, “संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून या पदाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.”यावेळी जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments