एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या . तब्बल दीड वर्षानंतर आरोपी अटकेत पीडीतेची सुखरूप सुटका
धाराशिव प्रतिनिधी /रूपेश डोलारे: उसतोड कामगाराच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी गुप्त आणि तांत्रिक तपास करून आरोपी आणि पीडित मुलीला अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाली.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,उसतोड कामगार असलेल्या फिर्यादी यांनी वाशी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती की, दि.18.03.2024 रोजी रात्री 01.30 वा. चे सुमारास त्यांच्या 15 वर्षीय मुलीस संशईत इसम सुनिल लक्ष्मण धोत्रे याने अज्ञात कारणावरुन फुस लावून पळवून नेले आहे. यावरुन दिनांक 23.03.2024 रोजी वाशी पोलीस ठाणे येथे कलम 363,370 भा.द.वि. या कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. सदर गुन्ह्याच्या तपास वाशी पोलीस ठाणे येथील अधिकारी यांनी करुन तो गुन्हा मा. पोलीस अधीक्षक धाराशिव यांनी दि.18.08.2025 रोजी सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष धाराशिव यांच्याकडे वर्ग केला होता.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, धाराशिव येथील अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय सचोटीने तपास करुन, गुप्तबातमीदार मार्फत माहिती काढुन, तांत्रिक तपास करुन गुन्ह्यातील आरोपी व अपहरीत अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. ते दोघेजण अहिल्यानगर शहरात असल्याची खात्री झाल्याने पथकाने दि.11.09.2025 रोजी अपहरीत मुलगी व संशईत आरोपी सुनिल लक्ष्मण धोत्रे यांना अहिल्यानगर येथुन ताब्यात घेवून आज रोजी वाशी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगीरी मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, धाराशिवचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्री. सोनटक्के, महिला पोलीस हावलदार- नदाफ, पोलीस हावलदार- केवटे, पोलीस नाईक माने, यांच्या पथकाने केली आहे

0 Comments