धाराशिव मिनी मंत्रालयावर महिलाराज, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव पडताच राजकीय हालीचालींना वेग
धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेकडे गेले आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता समीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना बळ मिळाले आहेत त्याने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप जिल्हा परिषदेच्या गटाची आरक्षण निघाले नाही गटांचे आरक्षण निघताच उमेदवारीची दावेदारी निश्चित होईल दुसऱ्यांदा महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले असल्याने जिल्ह्यात पुन्हा महिलाराज येणार हे निश्चित झाले आहे.
राज्यपाल ,शासन आणि न्यायालयीन आदेशामुळे गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता होत आहेत ही निवडणूक विकास कार्यास महत्त्वाची आहे जिल्ह्यातील विविध गटांमध्ये निवडणुकीसाठी उत्साह वाढला असून उमेदवारांनी प्रचार प्रचारासाठी तयारी सुरू केली आहे धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुली झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे धाराशिवच्या मिनी मंत्रालयाची धुरा महिलेच्या हाती राहणार आहे.
महिला आरक्षणामुळे उमेदवारांची दावेदारी जोर धरू लागली आहे त्यामुळे पक्षांतर्गत समीकरणे वेगाने हलत आहेत आगामी निवडणुकीसाठी इच्छुक महिलांनीही मोठी संधी मानली जात आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचे आरक्षण दरवेळी बदलत्या यादीनुसार जाहीर केली जाते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वांची लक्ष अध्यक्षपदाचे आरक्षणाकडे लागली होते.अखेरीस या निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाने आरक्षण जाहीर केले अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी लागू झाल्याने अनेक दिग्गज नेत्यांच्या पत्नी तसेच राजकीय पक्षातील वजनदार कार्यकर्त्याच्या महिलांच्या दावेदाराची चर्चा रंगत आहे आतापर्यंत मागील कार्यकाळात इतर प्रवर्गातून सदस्यांना अध्यक्षपदाचे संधी मिळाली होती मात्र यंदा खुल्या गटातील महिलांना नेतृत्व दाखवण्याची संधी मिळणार असल्याने अनेकांमध्ये फील गुड चे विचार आहेत.
दिग्गजांच्या सौभाग्यवती अध्यक्षपदाच्या शर्यतीत
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग येणार आहे जिल्ह्यातील वजनदार दिग्गज नेत्यांच्या सौभाग्यवती मिनी मंत्रालयाचे अध्यक्ष पद मिळवण्यासाठी स्पर्धेत राहणार आहेत मात्र जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण अद्याप निघालेले नाही गटाच्या आरक्षण निघताच दावेदारी निश्चित होण्याची संकेत आहेत.
लेखन संपादक: आर.व्ही साखरे

0 Comments