आज पासून वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू अत्यंत खराब हवामान दरम्यान भूस्खलनानंतर दोन आठवड्यांसाठी होती स्थगिती-
कटरा ; भूस्खलनामुळे दोन आठवड्याहून अधिक काळ थांबलेली माता वैष्णोदेवी यात्रा रविवारपासून पुन्हा सुरू होणार आहे श्री माता वैष्णोदेवी बोर्डाने शुक्रवारी ही घोषणा केली. वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू करणे सशक्त आहे आणि अनुकूल व हवामान परिस्थितीवर अवलंबून आहे असे बोर्डाने म्हटले आहे गेल्या महिन्यात वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आली होती. अनुकूल हवामानाच्या अधीन राहून वैष्णोदेवी यात्रा 14 सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होईल तसेच माहिती आणि बुकिंग साठी वेबसाईटला भेट द्या अशी माहिती श्री माता वैष्णोदेवी(Vaishanvdevi mata) श्राइन बोर्डाने एक्स या सोशल मीडियावर दिली आहे.
26 ऑगस्ट रोजी जम्मू विभागात अत्यंत खराब हवामाना दरम्यान माता वैष्णोदेवी मंदिर(Vaishanvdevi Mandir) मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे 35 पेक्षा जास्त यात्रेकरूंना आपला जीव गमावा लागला आणि 10 पेक्षा जास्त जखमी झाले यामुळे श्री माता वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आली होती काही दिवसापूर्वी कटरा(Katra) येथे झालेल्या भुस्खलनानंतर प्रशासनाने हॉटेल्स आणि धर्मशाळा रिकामी करण्याचे आदेश जारी केले होते. जम्मू आणि काश्मीरचे(Jammukasmir) उपराज्यपाल मनोज सिंह यांनी श्री माता वैष्णोदेवी मंदिर रस्त्यावरील अखदुवारी जवळ झालेल्या भुस्खलनाची घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते ही समिती पुढील आठवड्यात श्राइन बोर्ड अहवाल सादर करेल असे आदेशात म्हटले आहे.

0 Comments