तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तत्परतेने मदत मिळावी संबंधित प्रशासनाला सूचना-Omrajenibalkar Chivari Crop Damage Seen

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तत्परतेने मदत मिळावी संबंधित प्रशासनाला सूचना-Omrajenibalkar Chivari Crop Damage Seen

तुळजापूर तालुक्यातील चिवरी  परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तत्परतेने मदत मिळावी संबंधित प्रशासनाला सूचना-


चिवरी /राजगुरु साखरे : तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील चार दिवसापासून सातत्याने ढगफुटी सदृश पावसाने धुमाकूळ घातला होता यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दिनांक 19 रोजी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे झालेल्या पीक नुकसानीचे  पाहणी केली शेतकऱ्यांना धीर देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्परतेने मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.


मागील चार दिवसापासून जिल्ह्यात सलग झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे शुक्रवारी दि,१९ रोजी   भागातील शेती पिकांची पाहणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरित कारवाई करावी शासनाने ज्या निकषानुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथील करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकरी हेच आपल्या राष्ट्राचे आधारस्तंभ असून त्यांच्या कठीण परिस्थितीत सरकारने तातडीने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून नक्कीच हात पुढे करण्याची गरज असल्याची भावना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यासमोर बोलताना व्यक्त केली. तसेच कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांनी धीर सोडू नये खचून जाऊ नये आपण शासनाकडे तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करीत असून सणोत्सा पूर्वी ही मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्याची प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments