खडतर व संघर्षमय जीवन प्रवास करणाऱ्या तीर्थ येथील श्रीमती प्रियंका रघुवीर पासले यांचा दुर्गा शक्ती म्हणून होणार सन्मान

Hot Posts

6/recent/ticker-posts

खडतर व संघर्षमय जीवन प्रवास करणाऱ्या तीर्थ येथील श्रीमती प्रियंका रघुवीर पासले यांचा दुर्गा शक्ती म्हणून होणार सन्मान

खडतर व संघर्षमय जीवन प्रवास करणाऱ्या तीर्थ येथील श्रीमती प्रियंका रघुवीर पासले यांचा दुर्गा शक्ती म्हणून होणार सन्मान.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थांमार्फत शारदीय नवरात्र महोत्सव यंदा नऊ दिवस नऊ दुर्गाचा होणार सन्मान.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने नऊ दिवस नऊ दुर्गांचा सन्मान होणार असल्याचे मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.मंदिर संस्थानच्या वतीने हा प्रोत्साहनपर व प्रेरणादायी उपक्रम राबवला जात असल्याने महिला वर्गातून मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीमार्फत नवदुर्गा म्हणून नऊ महिलांची निवड केली असून त्यामध्ये तीर्थ येथील श्रीमती प्रियंका रघुवीर पासले  यांचा समावेश आहे.श्रीमती प्रियंका रघुवीर पासले यांचा खडतर असा जीवनप्रवास पाहिला तर अंगावर रोमांच उभे राहतील असा त्यांचा जीवन प्रवास एकामागून एक अशा संकटाची मालिका सुरू झाली सर्व काही संपत आहे जीवन जगणे नकोसे झाले पण हार न मानता सर्व संकटाशी सामना करीत सामाजिक व आर्थिक सुविधेच्या कार्यात झोकून दिले बचत गटाच्या माध्यमातून ही उत्कृष्ट कार्य करीत महिलांचे संघटन करीत स्वतः सह इतरांनाही उपजिविकेचे साधने निर्माण करून दिले उमेद अभियानात ही सक्रिय राहत सध्या प्रियंका रघुवीर पासले या सी.एल. एफ.मॅनेजर म्हणून मंगरुळ प्रभागावर कार्यरत आहेत.त्यांच्या या प्रयोगशील उपजीविका उपक्रम आणि संघर्षमय जीवन प्रवासाचां अध्याय पाहूनच त्यांच्या संघर्षमय अशा जीवन प्रवासाची दखल घेत श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. श्रीमती प्रियंका रघुवीर पासले यांचा नवदुर्गा म्हणून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून सन्मान होत असल्याने त्यांचे तीर्थ ग्रामस्थ, बचत गट संस्था व इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments